Thursday, June 30, 2022

अविवाहित जोडपेही राहू शकतात लॉजवर, पोलिसांनी त्रास दिल्यास अशी करा तक्रार….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये असाल आणि पोलिस तुमची चौकशी करण्यासाठी आले तर घाबरण्याची गरज नाही.

अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही.

चला याविषयी अधिक जाणून घेऊ.सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गर्ग म्हणतात की, अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा

मूलभूत अधिकार आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की दोघेही प्रौढ असावेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या

इच्छेने कोणाशीही जगण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही.लग्नाशिवाय जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहत असतील

तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. ज्येष्ठ वकील विनय कुमार गर्ग यांचे म्हणणे आहे की, हॉटेलमध्ये राहताना पोलिसांनी अविवाहित जोडप्याचा छळ केला किंवा अटक केली

तर ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाईल. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात हे जोडपे राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये थेट सर्वोच्च न्यायालय किंवा कलम 226 अंतर्गत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

हॉटेलमध्ये राहणाऱ्या अविवाहित जोडप्याला त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रार करता येईल. याशिवाय

पीडित जोडप्याकडे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना गर्ग म्हणाले की, हॉटेल अविवाहित जोडप्याला विवाहित नसल्याच्या

कारणावरुन थांबू शकत नाही. हॉटेलने असे केल्यास ते मुलभूत अधिकाराचे उल्लंघनही मानले जाईल. याचा अर्थ अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहता येते.

हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे राहत असतील आणि छापेमारीच्या वेळी पोलिस त्यांच्याकडे आले, तर अशा जोडप्याने घाबरून जाण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार,

अशा जोडप्याला त्यांचे आयकार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवावे लागेल, जेणेकरून दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत

आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नाहीत हे सिद्ध करता येईल.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!