Thursday, June 30, 2022

नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी राजकीय बातमी: या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार जाहीर करत आघाडी

घेतली . भाजपकडून राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते.राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच विरोधी

पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यामुळे भाजपचा तिसरा उमेदवार कोण असणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपकडून

एका जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपकडून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, माजी

खासदार धनंजय महाडिक या दोन नेत्यांची नावे सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत अशी माहिती समोर येत आहे. शिंदे, महाडिक या दोन नावांपैकी कोणत्या एका नावांवर

भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा राज्याचे माजीमंत्री प्राध्यापक राम शिंदे

यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज असलेले राम शिंदे हे धनगर समाजातील महत्त्वाचे मोठे नेते आहेत. राज्यात

त्यांना मानणारा वर्ग आहे.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून शिंदे त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. शिंदे हे सध्या पक्षसंघटनेत प्रदेश उपाध्यक्ष

म्हणून काम पाहत आहेत. पक्षसंघटनेत प्रामाणिकपणे काम करणारा निष्ठावंत नेता म्हणून शिंदे हे राजकीय वर्तुळात ओळखले जातात.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये

जे मोजके नेते आहेत त्यामध्ये राम शिंदे यांना ओळखले जाते. ओबीसी नेतृत्व असलेल्या राम शिंदे यांना राजकीय ताकद देऊन राज्यसभेत पाठवल्यास राज्यातील धनगर समाज आणि ओबीसी

समाज भाजप बरोबर राहण्याचा मोठी मदत होणार आहे. राम शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो.

माजी मंत्री राम शिंदे यांना राज्यसभेची लॉटरी लागणार असल्याची चर्चा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. अहमदनगर जिल्हा भाजप मध्ये सध्या शिंदे यांचे वर्चस्व आहे.

शिंदे यांना खासदार केल्यास अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.राम शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तुळात

रंगु लागल्याने सध्या शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!