Thursday, June 30, 2022

लायसन्सच्या नियमात मोठा बदल; आता RTO मध्ये जायची गरज नाही

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने आता वाहन चालकांची मोठ्या त्रासातून मुक्तता केली आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी यापुढे तुम्हाला RTO ऑफिसला जावं लागणार नाहीये. कारण सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.या नियमांनुसार

लायसन्स काढण्यासाठी ड्रायव्हिंग चाचणी आवश्यक असणार नाही. कारण सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्यानुसार, वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन

कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नसल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच ड्रायव्हिंग लायसन्स RTOच्या वेटिंग लिस्टमध्ये

आहेत त्यांनाही यातून दिलासा मिळणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO मधील चाचणीची

वाट पाहावी लागणार नाही. शिवाय आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकतो.मात्र, ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण

करावी लागणार आहे. जे अर्जदार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करतील त्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे, लायसन्स देण्यात येणार आहे.

सरकारचे नवीन नियमावली –

दुचाकी, तीनचाकी व हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे बंधनकारक आहे.

मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांसाठी दोन एकर जमीन आवश्यक आहे.

प्रशिक्षक १२वी उत्तीर्ण असावा तसेच त्याला ५ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.

हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त ४ आठवडे असेल.

ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम २ टप्प्यांमध्ये विभागला जाईल. थेअरी आणि प्रॅक्टिकल

थेअरी टप्पा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ८ तासांचा असेल, त्यामध्ये रस्त्यावरील मार्गदर्शक सूचना समजून घेणे, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन

चालविण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल. तसंच लोकांना सामान्य रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग,

चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी २१ तास घालवावे लागणार आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!