माय महाराष्ट्र न्यूज:मान्सूनची प्रगती थांबली असून तो रत्नागिरीतच थबकला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी आज शनिवारी (दि. १७) ट्विट करत दिली आहे.
पण दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांमध्ये आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये १९-२२ जूनपर्यंत मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मान्सून रत्नागिरीतच अडखळला असून त्याचा राज्यभरातील
त्याचा पुढचा प्रवास सध्या थांबला आहे. आजही मान्सूनची काही प्रगती दिसून आलेली नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. दरम्यान, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीची
परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गेल्या ६ तासांमध्ये १० किमी प्रतितास वेगाने ईशान्य दिशेकडे सरकले आहे. आज १७ जून रोजी ते सकाळी राजस्थानच्या बाडमेरच्या दक्षिणेस सुमारे ८० किमी आणि जोधपूरच्या नैऋत्येस २१० किमी
अंतरावर घोंघावत होते. पुढील ६ तासांत ते पूर्व-ईशान्येकडे सरकून कमकुवत होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.१७ जून रोजी दक्षिण राजस्थानमधील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी
मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच गुजरातचा उत्तर भाग आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.