Friday, July 1, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? सरकारमध्ये काँग्रेस बाहेर पडणार? उद्या दिल्लीत फैसला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार असल्याची

धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यासाठी उद्या दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी

‘न्यूज 18 लोकमत’ला दिली आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम

वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस

नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्वाची बैठक

होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नाही, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान, आणखी एक महत्त्वाची

बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आता काँग्रेसमध्ये अंतर्गत

धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडच्या

निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. तसंच बिहारमधून कन्हैया कुमार,

कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांच्या नावाची चर्चा आहे. या तिन्ही नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस हायकमांड उत्सुक आहे. पण, राज्यातील अनेक जण इच्छुक असताना

बाहेरील नेत्याला संधी देत असल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. इतर राज्यातील उमेदवार असल्यास क्रॉस व्होट करू, असा निर्धार आता महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एक जागा जिंकू शकते, भाजप 2 आणि राष्ट्रवादी एक जागा जिंकू शकते. एक जागा सुरक्षितपणे जिंकण्यासाठी

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एका जागेवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे.काँग्रेस पक्षाकडून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. महाराष्ट्रमधून

राज्यसभासाठी इमरान प्रतापगढी नाव निश्चित झाल्याची विश्वासनिय सूत्रांची माहिती आहे. अल्पसंख्याकाला महाराष्ट्रामधून राज्यसभा उमेदवारी देण्यासाठी प्रियंका गांधी आग्रही

असल्याची सूत्रांची माहिती आहे. इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!