Friday, July 1, 2022

अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.बन्सी सातपुते यांची निवड

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील नजीक चिंचोली येथील प्रसिद्ध विधिज्ञ अड.कॉ.बन्सी सातपुते यांची अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शनिवार दि.28/29मे रोजी शिरपुर जि.धुळे येथे अखिल भारतीय किसान सभेचे 30 वे राज्य अधिवेशन पार पडले. किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ.अतुलकुमार अंजान यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले.कॉ.मदन परदेशी अध्यक्षस्थानी होते. अधिवेशनात राज्यातील 27 जिल्ह्यातील 260 प्रतिनीधींची उपस्थिती होती.राजकिय व संघटनात्मक अहवाल कॉ.राजन क्षीरसागर यांनी मांडला.त्यावर 30 प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला. अधिवेशनात 35 महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.

या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवडण्यात आले.71 जणांचे राज्य कौन्सिल तर 25 जणांची कार्यकारणी व 11जणांचे सचिव मंडळ निवडण्यात आले ते असे…

*अध्यक्ष-कॉ.हिरालाल परदेशी(धुळे),
*उपाध्यक्ष-कॉ.बन्सी सातपुते (अहमदनगर), कॉ.राजु देसले (नासिक), डॉ.महेश कोपुलवार (गडचिरोली), आत्माराम विशे(ठाणे)
*जनरल सेक्रेटरी- कॉ.राजन क्षीरसागर (परभणी)
*सचिव-अशोक सोनारकर (अमरावती), अरुण वनकर (नागपूर), राजु पाटील (लातुर), साक्षी पाटील (पालघर)
*खजीनदार- अशोक सुर्यवंशी
राज्य कमेटीवर अहमदनगर जिल्ह्यातील निवृत्ती दातीर,बापुराव राशिनकर व निर्मला खोडदे यांची निवड करण्यात आली.

अधिवेशनात शेतकरी व जनतेच्या विविध प्रश्नावर 22 ठराव करण्यात आले व त्यावर आंदोलन उभे करण्याण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी एम.एस.पी.चा कायदा करावा.खरिपाची पेरणी सूरू होण्यापूर्वी शेती मालाचे हमीभाव जाहीर करावेत.शेतकरी ,शेतमजूर भुमीहिन,ग्रामीण कारागीर यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा 5000 पेन्शन मिळावी यासाठी कायदा करावा.उसाला 8.50% रिकव्हरीला 3500टन भाव मिळावा.उपपदार्थ निर्माण करणाऱ्या साखर कारखान्यांकडुन उपपदार्थाचे वेगळे पेमेंट मिळावे.गळीताअभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाख रूपये भरपाई मिळावी.शेतीला मोफत व दिवसा विजपुरवठा व्हावा. थकित विजबील माफ करावे.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. शेती मालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून भाव मिळावा.शेतकऱ्यांच्या मुलामुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत मिळावे.शेतीसाठी लागणारी शेती निविष्ठा, खते बि.बियाणे औषधे जी.एस.टी मुक्त करून त्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणा.शेतीसाठी लागणारे डिझेल पेट्रोल करमुक्त दरात पुरवा.भुसंपादन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.कांद्याला 30रू.किलो व दुधाला 40रु.हमी भाव मिळावा व उपपदार्थ निर्मीतीतील नफ्यात वाटा मिळावा.कापसाला 12000रु.क्विंटल व सोयाबीनला 10000रू हमीभाव मिळावा व त्याची खरेदी सरकारने करावी.बंद पडलेले साखर कारखाने सुरु होण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करा.नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले पन्नास हजार रूपयाचे सानुग्रह अनुदान विनाअट द्या. जाहीर केलेल्या कुठल्याही कर्ज माफीत पात्र न ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जे माफी मिळावी आदी ठराव या अधिवेशनात करण्यात आले.अधिवेशन सुरु होण्या अगोदर शेतकऱ्यांची प्रचंड मोठी मिरवणूक काढण्यात आली.जाहीर सभेला कॉ.अतुल अंजान.कॉ.तुकाराम भस्मे डॉ.भालचंद्र कांगो आदी वक्त्यांनी संबोधित केले.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!