भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील भगवान कांतीलाल फुलारी (वय 40 वर्षे ) हा तरुण बँक अधिकारी व डाळ मिल उद्योजक दि. 30/05/2022 रोजी पहाटे 04:30 वाजे पासून गायत्री मिल भेंडा येथून बेपत्ता झाला आहे.
याबाबद विष्णु कांतीलाल फुलारी( वय 34 वर्षे) धंदा-ग्रामपंचायत भेंडा बुद्रुक लिपीक रा.भेडा बुद्रुक,ता,नेवासा याने नेवासा पोस्टेमध्ये दिलेल्या लेखी खबरीत म्हटलं आहे की,माझा मोठा भाऊ भगवान फुलारी हा रुख्मीनी सहकारी बँक पाईपलाईन एकदिरा चौक येथे मॅनेजर म्हणून नोकरीस असल्याने कुटुंबासह तपोवन रोड सैनिक चौक अहमदनगर येथे त्यांचे स्व:ताचे घरात राहतात. आमची भेडा येथे गावी गायत्री पल्सेस मिल भेंडा बु तरवडी रोड येथे आमची दाळ मिल असल्याने ते देखरेख करणे कामी बँकेचे सुटटीचे दिवशी येत असतात.
दि. 27/05/2022 रोजी रात्री 08:30 वाजेचे सुमारास माझा मोठा भाऊ भगवान हा बँकेला शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने तो दि. 27/05/2022 रोजी रात्री 08:30 वा सु· गावाकडे भेंडा बु ता नेवासा येथे आला होता. दि. 28/05/2022 रोजी माझा भाऊ दिवसभर गायत्री पल्सेस मिल भेंडा बु तरवडी रोड येथे जाउन दैनदिन कामकाज केले व त्यानंतर सायंकाळी 06:30 वा सुभेडा बु येथे घरी येवून पुन्हा रात्री 08:30 वा सु दाळ मिलवर जाउन चक्कर मारुन परत घरी रात्री 11:30 वाजे सुमारास भेंडा बु येथे घरी आले व त्यांचे बेडरूम मध्ये झोपले. त्यानंतर दि. 29/05/2022 रोजी सकाळी 08:30 वासु ते झोपेतून उठुन परत ते गायत्री पल्सेस मिल भेंडा बु तरवडी रोड येथे गेले दिवसभर मिलचे कामकाज पाहुन परत भेंडा बु येथे राहते घरी येवून रात्री 09:00 वा सु परत गायत्री पल्सेस मिल भेंडा बु तरवड़ी रोड येथे बाबा ट्रान्सपोर्टची ट्रक दाळ भरणे कामी येणार असल्याने भाउ तेथेच थांबले त्यांनी रात्री 12:00 वा सु ट्रक मध्ये दाळ भरून दिली ते दाळमिल वरच मुक्कामी राहीले.
आज दि. 30/05/2022 रोजी पहाटे 04:30 वा सु ते दाळ मिल वरून त्यांचे शेतामध्ये सकाळचा प्रात विधी करणेसाठी गेले होते असे दाळ मिल वरील कामगार चेला याने पाहीले होते. त्यानंतर गायत्री पल्सेस मिल भेडा बु तखड़ी रोड़ येथे मॅनेजर असलेले किशोर वायकर रा भेडा खु हे सकाळी 07:30 वा सु दाळ मिल पर गेले असता भाऊ मिल वर दिसले नाही. म्हणून त्यांचे मोबाईलवर फोन केला असता भावाचा मोबाईल मिल वरच होता. म्हणून मॅनेजर याने भाऊ हा भेडा बु येथे घरी आहे काय असे विचारणे साठी भावजई गायत्री हीस फोन करून विचारणा केली असता भाउजई ने सांगीतले की ते अदयाप पावेतो घरी आले नाही असे कळविले असता माझ्या पत्नी शितल होने मला फोन करून कळविले की भाऊ हे दाळ मिल वर पण नाही आणि घरी पण नाही आले नाही .असे कळविले असता मी दाळ मिल वर जाउन भाउ भगवान याचा दाळ मिल परीसरातील दाळ मिल वरील कामगार यांचेसह शोध घेतला असता भाउ भगवान कांतीलाल हा मिळुन आला नाही.तरी दिनांक 30/05/2022 रोजी पहाटे 04:30 वास शौचालयास दाळ मिलचे बाजुस शेतामध्ये गेले व ते परत मिळुन आले नाही म्हणून माझा वरील वर्णनाचा भाउ भगवान कांतीलाल फुलारी याचा आपले मार्फतीने शोध होणेस विनंती.
या लेखी खबरी वरून नेवासा पोलीस ठाण्यात मिसिंग रजि. नं.
48/2022 12/13 नुसार मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शनाखाली पोना बी आर कोळपे हे पुढील तपास करत आहे.
रंग काळा सावळा, चेहरा गोल, केस काळे कुरुळे, उंची 162 से मी, अंगात काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, निळ्या कलरचा टी शर्ट त्याचेवर आडवे काळे रंगाची पटटी, पायात काळ्या रंगाची चप्पल असा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास नेवासा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.