Friday, July 1, 2022

सर्वांनी धर्मासाठी एकत्र या-निवृत्ती महाराज इंदुरीकर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

काही स्वार्थासाठी धर्माचा वापर करत आहेत. आता धर्मावर संकट आले असून आपण आपल्या धर्मावर निष्ठा ठेवली पाहिजे. कुणावरही संकट आले तरी चालेल मात्र धर्मावर संकट येता कामा नये. कोणी कुठेही राहा मात्र धर्मासाठी एकत्र या असे आवाहन समाजप्रबोधनकार व प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र ताजनापूर येथिल श्री शनेश्वर देवस्थानचे वतीने शनी जयंती उत्सव निमित्त आयोजित हरिनाम सप्ताह सांगता काल्याच्या कीर्तन सेवे प्रसंगी इंदुरीकर महाराज बोलत होते. यावेळी कोनोशीचे सरपंच राजेंद्र दौंड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार मुंडे, लहुजी सेनेचे अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर, नांदेड येथील वखार महामंडळ शाखा अध्यक्ष राजेंद्र विर, सरपंच अशोक दारकुंडे, शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष संभाजी बेळगे, नारायण बलिया, सरपंच अशोक गायकवाड, दत्तात्रेय लंगोटे, लक्ष्मण नजन, युवानेते सुंदर खंडागळे, लक्ष्मण खरात, अशोक वीर, संजय लंगोटे, संपत नवले उपस्थित होते.
इंदुरीकर म्हणाले, “आपला धर्म व संस्कृती टिकविण्याबरोबरच येणाऱ्या पिढीला योग्य संस्कार होण्यासाठी यावर्षी पासून प्रत्येक शाळांत दररोज हरिपाठ सुरू झाले पाहिजे. हरिपाठ काळाची गरज असून यासाठी पालकांनी शाळांकडे आग्रह धरण्याची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकमाणसाने व्यक्ती म्हणून एक झाड लावले पाहिजे.
दरम्यान, शनी जयंती निमित्त आज पहाटे नेवासा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे याचे हस्ते शनी मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. सप्ताह यशस्वी होण्यासाठी देवस्थानचे ईश्वर बलिया, बाबासाहेब चव्हाण, पांडुरंग नाबदे, मनसे तालुका उपाध्यक्ष रामेश्वर बलिया, बाळासाहेब गर्जे, ऍड.विजय कराड, विष्णुपंत नाबदे, भगवान गिरे, सचिन बेळगे, नितीन मडके, शरद बेळगे, राहुल वीर, प्रा. भिमराव वाघ, कुमार वीर, संतोष काळे, भाऊसाहेब नजन, सोपान काळे, किशोर लंगोटे, जीवा गायकवाड, तानाजी आरले, विजय शहाणे, पांडुरंग वेताळ, शेषराव वेताळ, किसनराव मैदांडा, गंगाधर नजन, ज्ञानेश्वर कोल्हे, श्रीधर नजन, अशोक लेंडाळ यांच्यसह आदी ताजनापूर, खुंटेफळ, दादेगाव, बोडखे, जुने व नवीन दहिफळ ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.
——–

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!