Saturday, July 2, 2022

नगर जिल्हा हादरला:पतीचे अनैतिक संबंध पकडल्याने पत्नीचा खुन

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पतीचे आपल्या जवळच्याच व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे पत्नीने उघड केले. झाली चुक आता परत असले चाळे नको म्हणून

समज देखील दिली. मात्र, चटक लागलेल्या पतीने तो नाद सोडून न देता आपल्या रस्त्यातला काटाच काढण्यासाठी आपल्या पत्नीचा खून केला.

ही घटना सोमवार दि. 30 मे 2022 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आरती राजेंद्र मुन्तोडे (वय 35, रा. शिबलापूर, ता. संगमनेर) या महिलेचा मृत्यु झाला आहे.

या महिलेचा मृतदेह आश्वी खुर्द येथील पाटाच्या पाण्यात जखमी आवस्थेत मिळुन आला आहे. त्यामुळे, यात राजेंद्र यशवंत मुन्तोड, रविंद्र यशवंत मुन्तोड, रंजना रविंद्र मुन्तोड, अलकाबाई

यशवंत मुन्तोड, प्रकाश सखाराम गायकवाड, शिला प्रकाश गायकवाड अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील पाच जणांना कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी

अटक केली असून एक आरोपी पसार आहे.याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र आणि आरती यांचे काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. मात्र, राजेंद्र यास बाहेरचा

नाद लागल्यामुळे, त्याचे घरात फारसे लक्ष लागत नव्हते. हा प्रकार मयत आरती हिच्या लक्षात आला होता. त्यामुळे, तिने पतीस विचारले मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर

मात्र हिने आपल्या पतीवर लक्ष ठेवले. दरम्यानच्या काळात राजेंद्र हा जवळच्या एका महिलेसोबत लगट करीत असल्याचे लक्षात आले असता तिने त्यांना समजून सांगितले. मात्र, हा प्रकार

तरी देखील थांबला नाही. उलट राजेंद्र याने पत्नीस बेदम मारहाण केली. नंतर मात्र, यांचा राजरोस कारभार सुरूच राहिला. त्यामुळे, हा लफडेबाजीचा आणि मारहाणीचा प्रकार मयत आरती

हिने आपल्या भावांना सांगितला. त्यानंतर पाहुणे असे काय करता? आपल्याला चांगली बायको आहे मुले आहेत हे समजून सांगण्यासाठी एक बैठक देखील भरविण्यात आली. त्यानंतर पुन्हा

असे काही होणार नाही. मी पत्नीस मारहाण करणार नाही, नको त्या वाटेला जाणार नाही असे चार चौघात कबुल करण्यात आले. मात्र, हे सर्व करत असताना राजेंद्र यास उपरोक्त पाचही व्यक्तींची फुस होती.

दरम्यान, यांच्यात थोडे दिवस चांगले चालले. मात्र, एक दुचाकी घ्यायची म्हणून राजेंद्र याने आपल्या पत्नीस त्रास देण्यात सुरूवात केली. तुझ्या भावांकडून पैसे आण अशी त्याने

वारंवार मागणी केली. मात्र, आपल्या बहिनीला त्रास नको म्हणून भावाने दुचाकी घेण्यास पैसे देखील दिले. त्यानंतर यांचा संसार पुन्हा थोडे दिवस चांगला चालला. त्यानंतर राजेंद्र याचा

गोपनीय कारभार चालुच होता. हे जेव्हा आरतीला समजले तेव्हा तिने पुन्हा त्यास जाब विचारला. मात्र, उलट तिलाच वेड्यात काढण्याचे काम राजेंद्र यशवंत मुन्तोड, रविंद्र यशवंत मुन्तोड, रंजना रविंद्र मुन्तोड,

अलकाबाई यशवंत मुन्तोड, प्रकाश सखाराम गायकवाड, शिला प्रकाश गायकवाड अशा सहा जणांनी केले. मात्र, आज ना उद्या पती आणि हे सर्व लोक सुधरतील, यांना खरे काय ते माहित होईल.

पती देखील योग्य वळणावर येतील असे मयत आरतीला वाटत होते असे अविनाश पोपट गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, 28 मे 2022 रोजी सकाळी 12:30 वाजण्याच्या

सुमारास राजेंद्र याने अविनाश यांना फोन केला होता. की, तुमची बहिन माझ्यासोबत वाद घालत आहे. त्यामुळे, ती माळेगाव हवेली येथे गेली आहे. त्यानंतर आरतीच्या भावांनी तिची वाट

पाहिली. मात्र, तीचा कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे, तिच्या भावाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सासरी गेला असता तेथे आरोपी यांनी आरतीच्या भावास मारहाण केली.

मात्र, बहिन भेटली नाही म्हणून त्याने पोलीस ठाणे गाठले आणि मिसिंग दाखल केली. त्यानंतर, प्रकाश सखाराम गायकवाड याने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की, आरती ही माळेगाव हवेली येथे आहे.

असे सांगून लेखी जबाब दिली. मात्र, तो खोटा असून केवळ पोलिसांची दिशाभूल केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, दि. 30 मे 2022 रोजी सकाळी अविनाश यांना आश्वी

येथून फोन आला. की, अश्वी खुर्द येथील पाटाच्या पाण्यात एक स्त्री जातीचे प्रेत पाईपला लटकलेले आढळून आले आहे. त्याची खात्री करण्यासाठी या असा निरोप आला. तेव्हा, पाटाच्या

पाण्यातून मृतदेह बाहेर काढला असता तो पुर्णपणे काळानिळा झालेला होता. मात्र, ती आरती असल्याची खात्री झाली. तिच्या हातावर, पोटावर फोड आलेले होते. त्यावेळी दिसताच

क्षणी हे लक्षात येत होते की, ही आत्महत्या नसून तिची हत्याच करण्यात आली आहे. त्यानंतर घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन आणि अन्य गोेष्टी झाल्यानंतर अविनाश गायकवाड

यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!