Friday, July 1, 2022

शिर्डीत काँग्रेसचे अधिवेशन:महाविकास आघाडी सरकारवर नवे संकट; काँग्रेस शिर्डीत घेणार मोठा निर्णय?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून धुसफूस सुरूच असते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आमदारांना निधी न मिळणे, सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळणे अशा अनेक तक्रारी काँग्रेस मंत्र्यांनी मांडल्या आहे. त्यातच आता 1 आणि 2 जूनला शिर्डीत काँग्रेसचे अधिवेशन आयोजित

करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर याचा काय परिणाम पडतो हे पाहण्याचे ठरणार आहे.मागील दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. ज्यात

सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही

अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांडकडे मंत्री तक्रार करणार आहे.अशातच 1 आणि 2 जून रोजी काँग्रेस पक्षाने आपले अधिवेशन शिर्डीत आयोजित केले आहे.

शिर्डीतील काँग्रेस पक्षाचा अधिवेशन गाजणार आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत या अधिवेशनात निर्णय घेतला जाणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.महाविकास आघाडीमधील

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं शिर्डी अधिवेशनवर लक्ष असणार आहे. कारण, या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा बाबत दिशा ठरणार आहे. शिर्डी अधिवेशननंतर

काँग्रेसच्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे

नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास

आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर दिल्लीत महत्वाची बैठक होणार होती. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नव्हतं. मात्र, आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!