Friday, July 1, 2022

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतक्या’ फरकानं वाढणार वेतन

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी. कारण, केंद्रामागोमाग आता अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्याही वेतनात वाढ होण्याची चिन्हं आहेत.

केंद्रानंतर राज्य शासनानंही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.सध्या केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता देण्यात आला आहे.

त्याच श्रेणीत अनेक राज्यांनीही कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याची तयारी केल्याचं कळत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार असल्याचं कळत आहे.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) महागाई भत्त्याचा हप्ता वाढवण्याचं ठरवण्यात आलं होतं. यानंतर एरियर म्हणून 5 हप्ते देण्याचीही घोषणा करण्यात आली होती.

सरकारकडून याचे 2 हप्ते आधीच देण्यात आले असून, आता तिसऱ्या हप्त्याची वेळ आली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

2019 मध्ये महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत Group A मधील अधिकाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांच्या वेतनात 30 ते 40 हजार रुपयांची वाढ होणार आहे.

Group B मधील अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. तर, Group C अधिकाऱ्यांना 10 ते 15 हजार रुपयांचा फायदा वेतनात होणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 31% आहे. पुढच्या हप्त्याच्या परत्याव्यामध्ये तो वाढून 34 % होणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!