भेंडा
कुशल प्रशासक, उत्तम संघटक, लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील बसस्थानक चौकात आयोजित जयंती उत्सव कार्यक्रम प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे,बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे,पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,
ज्ञानेश्वरचे संचालक अशोक मिसाळ , शिवाजी कोलते,उद्योजक बापूसाहेब नजन,बाबासाहेब नजन,नागेबाबा देवस्थान अध्यक्ष शिवाजी तागड,अशोकराव वायकर, जनमित्र ग्रुपचे अध्यक्ष आबासाहेब काळे,डॉ. संतोष फुलारी, सिद्धांत नवले,बाजार समितीचे संचालक संतोष मिसाळ, ज्ञानदेव तागड,भाऊसाहेब तागड,अरुण गोर्डे,जयंती उत्सवाचे आयोजक किशोर मिसाळ यावेळी उपस्थित होते.