Friday, July 1, 2022

जलसंधारणाच्या कामासाठी नाला खोलीकरणात तीन मीटर खोलीची अट घालणारा शासन निर्णय बदलविण्याची गरज-भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

जलसंधारणाचे काम करीत असताना नाला खोलीकरणात तीन मीटर (दहा फूट) पेक्षा जास्त खोदू नये असा शासन निर्णय आहे.परंतु जमिनीपासून तीन मीटर नाला खोल केला तरी पावसाळ्यात बंधारा पूर्ण भरला तरी एक मीटर उंचीचेच पाणी मिळते.कारण बंधा-याचे बांधकाम जमिनीपेक्षा एक मीटर खाली असते व एक मीटर पाण्याची वाफ होते. त्यामुळे भरपूर पाउस पडूनही टंचाई कायम राहील.यासाठी 3 मीटर खोलीची अट असलेल्या शासन निर्णयात बदल करून 6 मीटर खोलीची परवानगी देण्याची गरज असल्याचे मत जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्नचे जनक निवृत्त भूवैज्ञानिक जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केले.

जलसंधारण कार्याविषयी बोलतांना श्री.खानापूरकर पुढे म्हणाले,आजकाल पाऊस पावसाळयात सुद्धा रोज पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाऊस सरासरी इतकाच पडतो, पण कमी दिवसात पडतो. त्यामुळे एकाच दिवशी 200 ते 250 मि.मि. पाऊस काही तासातच पडतो व लगेचच वाहून जातो. तसेच त्याच दिवशी हा 20 वर्षात पडणा-या पावसाचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की दरवर्षी सारखाच पाऊस पडत नाही. सध्या तर असे झाले आहे की सलग दोन वर्षे एकतर पाऊस खूप कमी पडतो किंवा पडतच नाही. कधी 300 मि.मि. तर कधी 1100 मिमि.पडतो.आता झाले असे की खूप पाऊस कमी वेळात पडला आणि लगेचच वाहून गेला म्हणून पाणी टंचाई व पाऊस खूपच कमी पडला म्हणूनही पाणी टंचाई.पाणी टंचाईवर कायमची मात करावयाची झाल्यास जेंव्हा खूप जास्त पाउस पडतो तेंव्हाच तो अडवला व जिरवला पाहिजे. इतकेच नाही तर सलग 2 वर्ष पाउस पडत नसल्यामुळे 3 वर्षासाठी शेतीला व पिण्यासाठी लागणारे पाणी अडविणे आवश्यक झाले आहे. पावसाचे पाणी आपण फक्त नाल्यातच अडवू शकतो पण जंगल कटाईमुळे नाले उथळ व अतिक्रमणामुळे निरुंद झाले आहेत. इतके 3 वर्षासाठी लागणारे पाणी अडवायचे झाल्यास हे उथळ व निरुंद झालेले नाले उगमापासूनच खूप रूंद म्हणजे अंदाजे 100 फूट व खूप खोल म्हणजेच किमान 30 फूट खोल करावे लागतील. यात एक अडचण आहे ती अशी की शासन निर्णय म्हणतो की जमिनीपासून नाल्याची खोली 10 फूटापेक्षा जास्त नको. 3 मीटर जरी नाला खोल केला तरी पावसाळ्यात बंधारा पूर्ण भरला तरी पाणी मिळते 1 मीटर उंचीचेच कारण बंधा-याचे बांधकाम जमिनीपेक्षा 1 मीटर खाली असते व 1 मीटर पाण्याची वाफ होते. शासन निर्णयात आवश्यक ते बदल त्वरित न केल्यास भरपूर पाउस पडूनही टंचाई कायम राहील. याबाबत सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून राहण्यासाठी नाला किमान 6 मीटर खोल करण आवश्यक आहे. अशा प्रकारचे काम धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातील 70 गावात झालेले आहे. तेथे आता एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला तरी शेतकरी 3 रे पीक घेतात. तालुक्यात टँकर अजिबात लागत नाहीत. पाण्यासाठी आत्महत्या नाहीत व शेतकरी 2 रे किंवा 3 रे पीक घेतात.या पदधतीने काम केल्यास महाराष्ट्राचा हा शेकडो वर्षांचा प्रश्न कायमचा सुटेल असे मला वाटते. यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करावे लागेल व हा 3 मीटर खोलीचा शासन निर्णय बदलावा लागेल.

*शासन निर्णय बदलल्यास होणारे फायदे…*

* यात कोठेही भूसंपादन नाही. विस्थापन नाही. पुनर्वसन नाही. जास्त पडलेल्या पावसाच्या पाण्याची साठवणूक व जिरवणूक होणार असल्यामुळे महापूराला कायमचा आळा बसणार आहे. जवळपास प्रत्येक गावात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची मिटणार आहे. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होउ शकणार आहे. टॅकर कायमचे बंद होउ शकतात मुबलक पाण्यामुळे दुष्काळाला कायमचा आळा बसणार आहे.

* एक बंधारा बांधणे व नाल्याचे खोदकाम याला वेळ लागतो 3 महिने. यात 500 मीटर लांब व 30 मीटर रूंद नाल्याचे 8 मीटर खोलीपर्यंत खोदकाम समाविष्ट आहे.
* नाल्याच्या खोदकामात निघालेली माती शेतात पसरवायची असल्यामुळे जमीन सुपीक होणार आहे. बारीक मुरुद्वारे बंडींगचे काम होणार आहे. आड़ मुरूम व कठीण दगड वापरून गांव रस्ते व शेतरस्ते करता येणार आहेत.
* बीज उपलब्ध नसलेल्या ठिकाणी शेतक-यांना सवलतीच्या दरात डिझेल इंजिन देऊन विजेचा प्रश्न सोडविता येऊ शकेल.
* एका बंधा-यामुळे अंदाजे 72 हेक्टर जमिनीला बारमाही पाणी मिळणार आहे.
* महापूरामुळे होणारे नुकसान व दुष्काळामुळे होणारी ससेहोलपट कायमची यांबणार आहे.
* प्रत्येक बंधा-यात वर्षातले 8 महिने किमान पाणी थांबणार असल्यामुळे मारोगारीचा उद्योग भरभराटीस येऊ “शकतो. त्यामुळे शेतक-याला जोडधंदा उपलब्ध होउन अधिकचे उत्पन्न मिळू शकेल.
* हे विकेंद्रित जलसंधारण असल्यामुळे कोठेही कॅनलचा खर्च, त्यासाठी जमिनीचे भूसंपादन इत्यादि खर्थ नाही. *प्रत्येक गावात 70 टक्के किमान बारमाही सिंचन शक्य होणार आहे. गावातच रोजगार उपलब्ध होणार
असल्यामुळे खेडयातून शहराकडे रोजगारासाठी आलेले सर्वच लोक परत खेडयाकडे परतु लागतील.
* दरवर्षी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याला वाट मोकळी करून देण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे कृत्रिम पूराचा
धोका राहणार नाही.
* उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे प्रकल्पाचे काम 2004 पासून आजपर्यंत धुळे जिल्हयातल्या शिरपूर तालुवातील 70 गावात पूर्ण झालेले आहे. उपरोक्त सर्व फायदे तेथील लोक अनुभवतात.

 

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!