Sunday, July 3, 2022

प्रेमी जोडप्यांना हे नियम माहित असणं गरजेचं, अविवाहित जोडप्यांनी याकडे लक्ष द्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करताना दाखवण्यात आले आहे.

 

यामध्ये हॉटेलमधील रुममध्ये राहाण्यापासून ते सार्वजनीक ठिकाणी आपल्या पार्टनर सोबत फिरण्यापर्यंत अनेक अडचणींचा समावेश आहे. आयुष्यात प्रत्येकाने हा अनुभव घेतला असणार.

 

खरंतर अनेकवेळा अनेक अविवाहित जोडपे अशा परिस्थितीतून जातात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, जोडप्यांना काही नियम माहित असणे आवश्यक आहे.

 

तुम्हाला देखील हे नियम माहित गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही या परिस्थीतून वाचू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगत आहोत, जे प्रत्येक अविवाहित जोडप्याला माहित असले पाहिजेत.

 

लग्न न करता जोडप्यांने एकत्र रहाणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आणि हा ट्रेंड काळाच्या ओघात झपाट्याने वाढला आहे. 2013 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या

 

संदर्भात म्हटले होते की, दोन प्रौढ व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी), ज्यामध्ये मुलीचे वय 18 वर्षे आहे आणि मुलगा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असेल.

 

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, दोघांनाही इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका खटल्याचा

 

निकाल देताना सांगितले होते की, प्रौढ झाल्यानंतर व्यक्ती एखाद्या व्यक्तीसोबत राहण्यास किंवा लग्न करण्यास स्वतंत्र असते.पण ज्याप्रमाणे पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला

 

खर्च आणि भत्ते देतो, त्याचप्रमाणे न्यायालय लिव्ह-इन नातेसंबंध संपुष्टात आल्यावर अंतिम निर्णय घेईल आणि दंडही ठोठावू शकेल.

अविवाहित प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नसल्याच्या बातम्या तुम्ही बर्‍याच वेळा ऐकल्या असतील. पण भारतीय कायद्याने प्रौढ जोडप्यांना हा अधिकार दिला आहे की, ते

 

कुठेही जाऊ शकतात आणि कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतात.प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. मात्र यासाठी दोन्ही भागीदारांना त्यांचे

 

ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत द्यावी लागेल.अनेक हॉटेल्समध्ये लोकल आयडी स्वीकारला जात नाही, त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अटी आणि शर्ती वाचा.तुमचं लग्न झाले

 

नसलं तरीही तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बसू शकता. IPC च्या कलम 294 नुसार, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले तर, त्याला 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

मात्र या कलमाचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असे कोणतेही कृत्य करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बसून बोलत असाल, तर तुम्हाला पोलीस अटक करू शकत नाहीत.

 

जर एखादे जोडपे असे नातेसंबंधात असेल, ज्यामध्ये अपमानास्पद शब्द वापरले जातात. अशा परिस्थितीत, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार, मुली संरक्षणाची मागणी करू शकतात.

भारतीय संविधानाने अनुच्छेद २१ द्वारे गोपनीयतेचा अधिकार प्रदान केला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, जोडपे खाजगी ठिकाणी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. सुप्रीम कोर्टाने

 

2017-2018 मध्ये 2 प्रकरणांवर आपला निर्णय पुन्हा दिला होता.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!