Thursday, June 30, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, सरकामध्ये काँग्रेस नाराज ? बाळासाहेब थोरातांनी दिले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी सारखं काही नाही. इम्रान प्रतापगढी महत्वाचा युवक कार्यकर्ता असून त्याने पक्षा

करता खूप काम केलंय. मुकुल वासनिक यांना राजस्थान मधून प्रतिनिधीत्व मिळालंय. आपण उत्तर प्रदेशला आणि राजस्थान आपल्याला मत देणार असल्याची स्पष्टोक्ती महसुलमंत्री

बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही, फक्त काही अडचणींवर दिल्लीत चर्चा होणार आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

शिर्डीमध्ये काँग्रेसकडून दोन दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने

पक्षात असलेल्या नाराजीवर थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं.काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

दिला होता. यावर बोलताना आशिष देशमुख युवक नेता आहे. वयामुळे थोडासा लवकर गरम होतो. संघटनेत सर्व व्यक्तीमत्व महत्वाचे आहेत. त्यांच्या कुटुंबाचं काँग्रेससाठी महत्वाचं योगदान आहे.

आम्हाला त्यांचा सहभाग काँग्रेसमध्ये हवाय. नाराजीबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.आमचे प्रमुख नेतृत्व दिल्लीत आहे. अनेकदा दिल्लीत बैठका होत

असतात. आमचं तीन पक्षांचे सरकार आहे. काही प्रश्न तर आहेच, अडचणी आहेत मी ते नाकारत नाही. पण एका पक्षाचे सरकार असलं तरी अंतर्गत प्रश्न असतातच. तीन पक्षांतील

आमच्या सरकारमधील अडचणींची चर्चा दिल्लीत होणार आहे. मात्र केवळ त्याकरता बैठक आहे असं नाही, असंही थोरांतांनी महाविकास आघाडीत असलेल्या नाराजी बाबत बोलताना स्पष्ट केले.

सप्टेंबरनंतर अनेक निवडणुका होणार आहेत. चिंतन शिबिरात यावर ही चर्चा केली जाणार आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार असून निवडणुकीत

एकत्र येण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार असल्याचं म्हणलंय.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!