Saturday, September 23, 2023

नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारातील घटना… एसटी बसची मोटरसायकलला धडक;माळी चिंचोरा ग्रामपंचायतच्या महिला सदस्याचा मृत्यू

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी:नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारातील हॉटेल धनश्री नजीक एसटी बसने मोटरसायकलला धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवर बसलेल्या माळीचिंचोरा ग्रामपंचायतच्या महिला सदस्या

प्राजक्ता बापूसाहेब धानापुणे (वय २५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. १७ जून रोजी माळीचिंचोरा येथील बापूसाहेब लक्ष्मण धानापुणे व त्यांची पत्नी सौ.प्राजक्ता बापूसाहेब धानापुणे हे आपल्या तीन वर्षीय

मुलीसह मोटरसायकल एमएच १७ बीबी ४९५५ वरून वडाळा बहिरोबा येथे दवाखान्यात जात असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास अहमदनगर-छ.संभाजीनगर रस्त्यावरील बस थांबा नसलेल्या एका हॉटेल जवळ उभी असलेली एसटी बस क्रमांक एमएच

१४ बीटी ४३१२ ही छ.संभाजीनगरच्या दिशेने जाण्यासाठी वळत असताना या बसची मोटारसायकलला धडक बसल्याने झालेल्या अपघातात ग्रामपंचायत सदस्या सौ.प्राजक्ता धानापुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती बापूसाहेब धानपुणे व मुलगी हे गंभीर रित्या

जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना नंतर मयत प्राजक्ता यांच्या पार्थिवावरसायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान माळीचिंचोरा या ठिकाणी शोकाकुल वातावरणात

अंत्यसंस्कार करण्यात आला.अपघातात मृत पावलेली प्राजक्ता हि ४ महिन्याची गरोदर असल्याचे समजते.त्यामुळे माळीचिंचोरा गावासह नातेवाईकडांकडून अंत्यविधी दरम्यान हळहळ व्यक्त केली गेली.याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात

रजिस्टर नंबर ९६/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!