माय महाराष्ट्र न्यूज:त्वचेची निगा राखण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक जबाबदार असतात. काही पुरुषांना पुरुषांना त्वचेच्या काळजीकडे विशेष लक्ष देणे आवडत नाही.
त्वचेकडे लक्ष न दिल्याने ती कोरडी आणि निस्तेज होऊ लागते. दैनंदिन जीवनशैलीत काही चुका केल्याने त्वचेला (Skin) आणखी नुकसान होऊ शकते. पुरुषांची (Mens) त्वचा
ही स्त्रियांच्या तुलनेत अधिक कठीण असते. त्यामुळे पुरुषांच्या त्वचेवर कोणतीही प्रतिक्रिया क्वचितच दिसून येते. परंतु, त्वचेच्या काळजीमध्ये दररोज केलेल्या काही चुका आपल्या
त्वचेला खूप नुकसान पोहोचवू शकतात. त्यासाठी काही चुका टाळून पुरुष आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात.अधिकतर पुरुष चेहऱ्यासाठी साबणाचा वापर करतात ही जरी
सामान्य गोष्ट असली तरी साबण वापरु नये. साबणात असलेल्या रसायनांमुळे व जास्त साबण वापरल्याने त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे विशेषतः चेहऱ्यावर साबणाऐवजी फेसवॉश वापरणे कधीही चांगले असते.
उन्हाळ्यात त्वचा लवकर कोरडी पडते. अशावेळी आपण मॉइश्चरायझर लावून त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. चेहरा धुतल्यानंतर आपण त्वचेनुसार मॉइश्चरायझर लावून
त्वचेला कोरडेपणापासून वाचवू शकता.उन्हाळ्यात बहुतेकदा आपण चेहरा चमकदार ठेवण्यात व्यस्त असतो त्यामुळे आपण शरीराच्या इतर अवयवांकडे लक्ष देत नाही विशेषत: पायांच्या
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. मात्र उन्हाळ्यात घामामुळे पायांची त्वचा लवकर खराब होऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पाय आणि मोजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.तसेच पुरुषांना त्यांच्या
त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यासाठी काही सनस्क्रीन आपले काम सोपे करू शकते. घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लावून आपण उन्हापासून त्वचेचे संरक्षण करू शकतो.