नेवासा/ प्रतिनिधी
दि.29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर रोजी माऊंट आबू येथे होणाऱ्या पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय संमेलनास नेवासा तालुक्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नेवासा फाटा येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्राच्या प्रमुख ब्रम्हाकुमारी सरला बहेनजी व वंदना बहेनजी यांनी केले आहे.
अधिक माहिती देतांना सरला बहेनजी म्हणाल्या, राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंगतर्फे दि.29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “समाधान आधारित पत्रकारितेने समृद्ध भारत” या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.संमेलनात सहभागासाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9850693705 यावर संपर्क साधण्याचे आवाहन ब्रम्हाकुमारी
वंदना बहेनजी यांनी केले आहे.