Friday, July 1, 2022

विखे पाटलांना गावातच मोठा धक्का

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच गावात जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने लोणी खुर्द सहकारी

सेवा सोसायटीत विखे गटाचा १३/० असा दारुण पराभव करत २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले आहे.आमदार राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्व करत असलेल्या शिर्डी मतदार संघात

सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या. यातील अनेक सोसायट्या बिनविरोध करण्यात विखे पाटलांना यश आले. मात्र आता विखे पाटलांना त्यांच्याच लोणी गावात राष्ट्रवादी

काँग्रेसच्या जनार्दन घोगरे यांनी जोरदार धक्का दिला आहे. लोणी खुर्द गावात राष्ट्रवादीच्या जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन मंडळाने बाजी मारत विखे गटाचा १३/० असा दणदणीत पराभव करत

विजय संपादित केला. या विजयानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.दोन वर्षांपूर्वी लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत देखील

जनार्दन घोगरे यांच्या पॅनलने विखे गटाचा पराभव करत ग्रामपंचायतीवर वर्चस्व स्थापन केले होते. आता पुन्हा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घोगरे यांनी दणदणीत विजय

मिळवून २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. विखे गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात या निकालाची चर्चा होत आहे.तर, बाळासाहेब थोरात

यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात देखील विखे गटाचा पराभव झाला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मंडळाने सर्व जागांवर विजय मिळवत विखे

गटाचा १३/० असा पराभव केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जन्मगाव असलेले जोर्वे हे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडलेले असले तरी विखेचा करिष्मा

गावात दिसून आला नाही. दोन्ही गावच्या सोसायटी निवडणुकीत विखेंना धक्का बसला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रंगतदार होणार एव्हढं मात्र नक्की.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!