Thursday, June 30, 2022

बारावीच्या निकालाची तारीख निश्चित, लवकरच होणार घोषणा…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील इयत्ता बारावीच्या निकालांची तारीख जाहीर कऱण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी बारावीचे निकाल

ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून हा निकाल जाहीर करण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे www.maharesult.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्याना आपला निकाल पाहता येईल. पुण्यात पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

सर्व तयारी पूर्ण पुण्यात एक कार्यक्रमासाठी आलेल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती माध्यमांना दिली.

याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती सरकारच्या वतीनं जनतेला दिली जाणार आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना निकालाची तारीख जाहीर केली असली तरी नेमका किती वाजता निकाल जाहीर होणार, हे मात्र सांगितलेलं नाही. आतापर्यंतचा ट्रेंड पाहता साधारणपणे

सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केला जातो आणि दुपारी 1 वाजता तो ऑनलाईन उपलब्ध होतो. त्यानंतर विद्यार्थी लॉग इन करून आपापला निकाल पाहू शकतात आणि गुणपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकतात.

2021 साली कोरोनाच्या उद्रेकामुळे बारावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या होत्या. इंटर्नल इव्हॅल्युएशन पॉलिसीच्या आधारे विद्यार्थ्याना पास करण्यात आलं होतं. 2020 सालीदेखील

काही पेपर झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!