Saturday, July 2, 2022

हनिमूनच्या रात्री लाईट जाताच वधूने दिला 440 चा झटका अन् पुढे घडले नको ते….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:  प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यात लग्नाचा क्षण हा येतोच. याच क्षणाचा प्रत्येक व्यक्ती आतुरतेनं वाट पाहात असतो.

लग्नानंतर जोडप्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. त्यामुळे सर्व काही ठिक व्हावं अशी सर्वांचीच अपेक्षा असते. परंतु सगळ्यांचं आयुष्य सारखंच असेल असे नाही. जिथे चांगलं घडतं

तेथे वाईटही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच अवाक झाले आहेत.खरंतर शाहजहांपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न झाले.

परंतु त्याच्या हनीमुनच्या रात्रीच त्याच्या घराची लाईट गेली. मग काय जेथे नवरदेव स्वप्न रंगवत होता. तेथे ही नववधू अंधारात त्याला 440 चा झटका देऊन गेली.खरंतर वीज गेल्याचा

फायदा घेत नववधू घरातूळ पळाली सोबत तिने घरातील पैसे आणि दागिने देखील आपल्यासोबत पळवून नेले. जेव्हा लाईट आली तेव्हा नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली.

पालिया दारोबस्त गावातील रहिवासी असलेल्या रमेश पाल सिंह यांनी त्यांचा मुलगा रिंकू सिंगचा विवाह कुशीनगर जिल्ह्यातील पातरबा परिसरात राहणाऱ्या काजलसोबत केला.

27 मे रोजी सर्वजण नववधूला आणायला गेले होते. त्यानंतर 28 मे रोजी वधूला गावात आणण्यात आले.परंतु रात्री अकराच्या सुमारास वीज गेली होती. त्यामुळे घरात जास्त गरम होत

असल्याने रिंकू गच्चीवर गेला. तेव्हा या अंधाराचा फायदा घेत नववधूने सोन्या-चांदीचे दागिने आणि 11 हजारांची रोकड, मोबाईल आणि इतर साहित्य घेऊन तेथून पळ काढला.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रिंकू जेव्हा आपल्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्याची पत्नी बेपत्ता होती. त्याने घराची झडती घेतली, मात्र त्याला काहीही सापडले नाही. मुख्य दरवाजाही उघडा होता.

त्यानंतर या सर्वाची माहिती या नवऱ्याने इतर नातेवाईकांना दिली.जेव्हा रंकुने पत्नीच्या नंबरवर कॉल केला, तर मोबाईल बंद असल्याचे त्याला कळले. त्यानंतर मुलाने लगेच मुलीच्या घरच्यांशी

संपर्क साधला, तर तेथे देखील त्यांना उत्तर मिळालं नाही. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात

जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!