Sunday, July 3, 2022

नागेबाबा मल्टीस्टेटचे सहा लाख सभासदांचा टप्पा पुर्ण-कडूभाऊ काळे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर या मल्टिस्टेट पतसंस्थेने सहा लाख सभासदांचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी दिली.

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचे नगर जिल्ह्यासह राज्यभरातील विविध 57 शाखेतुन एकुण 6 लाख सभासद पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवार दि.6 जून रोजी भेंडा येथील मातृसंस्थेत
सभासद व कर्मचारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कारभारी गरड मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते .

नागेबाबा मल्टीस्टेट फक्त आर्थिक क्षेत्रातच काम करत नसून सामाजिक ,शैक्षणिक ,आरोग्य व धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. त्यांनी सुरू केलेला नगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची मोफत व्यवस्था हा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री.गरड यांनी म्हटले.

या मेळाव्यात पतसंस्थेचे सभासद राजेंद्र चिन्धे,कुंडलिक महाराज गोरे ,गणेश महाराज चौधरी,जेष्ठ संचालक गणपतराव गव्हाणे , श्रीकृष्ण उद्योग समूहाचे प्रमुख आबासाहेब काळे , किशोर मिसाळ , कादरभाई सय्यद आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

शाखाधिकारी सांतोष साप्ते यांनी विविध उपक्रमांची माहिती देतांना सांगितले की, 2030 पर्यंत एकुण 50 लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट सर्व कर्मचारी मिळुन साध्य करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास दिलदार शेख, लक्ष्मण थोरात ,रवींद्र व्यवहारे, मोहन वाघडकर सागर इटकर , पुजा भालसिंग , अमृता आरगडे, रविंद्र परसैय्या,ऐश्वर्या भुजबळ ,शिवनाथ वाघ ,सुभाष चौधरी,विवेक मनवेलीकर ,किशोर मारुती नवले , रवींद्र डौले , कल्याण सावंत आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!