Friday, July 1, 2022

माणूस म्हणून जगण्याची आद्य संकल्पना देणारे छत्रपती शिवाजी महाराजच होय.-मेधा देशमुख- भास्करन

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

” शेतसारा, चेन ऑफ कमांड, गुलामांची खरेदी-विक्री पद्धत बंदी, आदी शेकडो संकल्पनांचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती करून माणसाला जगण्याची  आद्य संकल्पना प्रदान केली. गुलामगिरीच्या दुय्यम स्थानापेक्षा स्वाभिमानाने जगण्याचे प्रथम स्थान महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजन्म संघर्ष केला. या संघर्षाला यशाची,पराक्रमाची , हौतात्म्याची व शौर्याची किनार आहे,” असे प्रतिपादन ” चॅलेंजिंग डेस्टिनी ” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित इंग्रजी पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय लेखिका मेधा मेधा देशमुख- भास्करन यांनी केले.

भारताच्या आजादी का अमृत महोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनानिमित्त तसेच अहमदनगर शहराच्या 532 व्या वर्धापन दिनानिमित्त तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण विभाग ,महाराष्ट्र राज्य,ग्रंथालय संचालनालय मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या माध्यमातून आयोजित अहमदनगरची अक्षर परंपरा व भारतीय इतिहासाचे मोती या उपक्रमात” झुंज नियतीशी ” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठी पुस्तकावर ‘ मेधा भास्करन देशमुख बोलत होत्या.

स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले व ग्रंथालयाच्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पना स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामदास शिंदे , हनुमान ढाकणे, संतोष कापसे, शैलेश घेगडमल, अमोल इथापे यांनी परिश्रम घेतले.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!