माय महाराष्ट्र न्यूज:वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार आता हॉर्न वाजवल्यास 12000 रुपयांचा दंड आकाराला जाण्याची शक्यता आहे. हे कसे होऊ
शकते, आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.मोटार वाहन कायदा नियम 39/192 नुसार, जर तुम्ही मोटारसायकल, कार किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाहन
चालवताना प्रेशर हॉर्न वाजवला तर तुमचे 10000 हजार रुपयांचे चलन कापले जाऊ शकते.यासोबतच तुम्ही सायलेन्स झोनमध्ये हॉर्न वाजवल्यास नियम 194F नुसार तुम्हाला 2000 रुपयांचे
चालान भरावे लागेल. त्यामुळे अशा प्रकारचा हॉर्न लावणं आणि वाजवणं टाळणं आवश्यक आहे.मोटार वाहन कायद्यानुसार, जर तुम्ही मोटारसायकल, स्कूटर चालवताना हेल्मेटची
स्ट्रीप लावली नसेल, तर नियम 194D MVA नुसार तुमचे 1000 रुपयांचे चालान कापले जाऊ शकते.तर दुसरीकडे तुम्ही सदोष हेल्मेट (BIS शिवाय) घातल्यास तुमच्याकडून 1000
रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हेल्मेट घातल्यानंतरही नवीन नियम न पाळल्याबद्दल तुम्हाला 2000 रुपयांचा भुर्दंड पडू शकतो.
तुमचं चालान कापलं गेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. यानंतर चेक
चालान स्टेटसचा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला चालान नंबर, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा ऑप्शन मिळेल. त्यानंतर ‘Get Detail’ वर
क्लिक करा. तुमच्या चालानचं स्टेटस तुम्हाला दिसेल.ऑनलाइन ट्रॅफिक चालान भरण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. त्यानंतर चालानशी
निगडित माहिती आणि कॅप्चा भरा. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. यानंतर नवं पेज ओपन होईल आणि त्यावर चालानची माहिती दिसेल.तुम्हाला जे चालान भरायचं आहे, ते सिलेक्ट
करा. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन चालान भरण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्याच्याशी निगडीत माहिती टाका आणि कन्फर्म करा. तुमचं ऑनलाइन चालान भरलं जाईल.