माय महाराष्ट्र न्यूज: झाडे तोडल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, हे भविष्यासाठी धोकादायक आहे. ज्या भागात जेवढे झाडे
जास्त तेवढा पाऊस रिमझीम पडतो. जेथे झाडे कमी तेथे तो जोरात पडतो व पाणी वाहून जाते. अहमदनगरचे तापमान गेल्या दोन वर्षांत जास्त
वाढल्याने राज्यात सर्वाधिक पाऊस अहमदनगर जिल्ह्यात पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्राचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शेतकरी पीक परिसवांद मध्ये पंजाबराव डख बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कृषी सेवा केंद्रचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत होते. कृष्णा महाराज, शास्त्री महाराज, मनसेचे जिल्हाप्रमुख देविदास खेडकर, नितीन दौंड,
शरद पवार, गोरक्ष खेडकर, विष्णू खेडकर, कानिफ आंधळे, कल्याण सुपेकर, मल्हारी खेडकर आदी उपस्थित होते.