भेंडा
नेवासा तालुक्यातील येथील भेंडा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मनीषा कैलास धानापुणे यांना
अहमदनगर जिल्हा गुरुकुल मंडळ व शिक्षक समिती यांच्या विद्यमाने गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा गुरुकुल मंडळ व शिक्षक समिती यांच्या विद्यमाने देण्यात येणारे गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार व
उत्कृष्ट शाळा पुरस्कार नगर येथे प्रदान करण्यात आले.मनीषा कैलास धानापुणे (जिल्हा पातळी क्रीडा क्षेत्रासाठीचा विशेष पुरस्कार) यांना अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ संमेलनाध्यक्ष सन्माननीय भारत सासणे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.आमदार मोनिकाताई राजळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर, गुरुकुल शिक्षण समिती राज्य उपाध्यक्ष रा.या. ओटी,शिक्षण समिती जिल्हाध्यक्ष संजय धामणे,गुरुकुल उच्चाधिकार समिती जिल्हाध्यक्ष नितीन काकडे,गुरुकुल मंडळ जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे,गुरुकुल महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.वृषाली कडलग,
नेवासाच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे,मीना ससाणे, पुणे विद्यापीठाचे संशोधन प्रमुख डॉ. सुधाकर शेलार, कवी प्रशांत मोरे, राजेश्वर शेळके,गुरुकुल मंडळ तालुकाध्यक्ष भारत गवळी,गेवराई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास धानापुणे,शिक्षक रवींद्र डौले आदी यावेळी उपस्थित होते.