माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. अशात वीजेचा दर देखील वाढल्याचं दिसत आहे. महागाईच्या या दुनीयेत काही
व्यक्तींना अव्वाच्या सव्वा लाईट बिल येण्याच्या घटना घडल्या आहेत. मिटरमध्ये काही गडबड असल्यास असे होण्याची शक्यता असते.बऱ्याच भाडेकरू व्यक्तींना हा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये कमी प्रमाणात
विजेचा वापर केला तरी जास्तीचे लाईट बील येते. बील जास्त येण्यामागे तुमची काही चूक नसून यात घरमालकाची चूक असते. घरमालक भाडेकरुसाठी एक जास्तीचा मीटर लावून देतात. या मीटरमध्ये काहीतरी छेडछाड केली
असल्यास कमी वापर करुनही जास्तीचा लाईट बिल भरावा लागतो.तुलना आणि निरिक्षण करुन पाहताना नुकताच पावसाळा लागला आहे हे लक्षात ठेवा. हवेत सर्वत्र गारवा पसरल्यामुळे आपण फॅनचा वापर फार कमी करतो. मात्र उन्हाळ्यात
जास्तीत जास्त फॅन आणि एसी चालवला जातो. त्यामुळे उन्हळ्यात सर्वाधिक लाईट बिल येत असतो.लाईट बिल तपासताना आधीच्या महिन्यातील लाईटबील तपासावा. आधीच्या महिन्यातील लाईट बिल (Light Bill) फार कमी आहे आणि आताच्या महिन्यातील
लाईटबील दुप्पट असेल तर समजून जा की तुमच्या मीटरमध्ये गडबड करण्यात आली आहे. या शिवाय तुम्हाला ठोस माहिती हवी असल्यास तुमच्या मीटर शेजारी आणखीन एक मीटर आणून बसवा. त्या मीटरमधून किती आणि जुन्या
मिटरमधून किती बील येत आहे हे तापासा. नवीन मीटरमध्ये कमी आणि जून्या मीटरमध्ये जास्त लाईट बिल असल्यास मीटरमध्येच गडबड असल्याचे स्पष्ट होते.