Thursday, June 30, 2022

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? कच्च्या तेलाच्या किमतीत दुप्पट वाढ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाने जुलैसाठी आशियाई देशांना विकावयाच्या

कच्च्या तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जवळपास दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल आणखी महागणार आहे.जुलैमध्ये आशियाई देशांना

निर्यात होणाऱ्या अरब लाईट तेलाची अधिकृत किंमत जूनच्या तुलनेत प्रतिबॅरल २.१ डॉलरने वाढविण्यात आली आहे. ओमान आणि दुबईच्या तेलाच्या तुलनेत सौदीच्या तेलाचे दर आता

६.५ डॉलरनी अधिक झाले आहेत. बहुतांश बाजारांतील भाकितांत ही वाढ १.५ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ६ पैकी केवळ एका प्रतिसादकाने २ डॉलरच्या

दरवाढीचा अंदाज व्यक्त केला होता.एका आशियाई तेल व्यापाऱ्याने सांगितले की, अरब लाईटच्या किमतीतील वाढ अगदीच अनपेक्षित असून आम्ही चक्रावलो आहाेत. सूत्रांनी सांगितले

की, वाढीच्या मूळ वेळापत्रकात रशियालाही गृहीत धरण्यात आले होते. तसेच अँगोला आणि नायजेरिया यांसारखे देश आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष

उत्पादन वाढ कमी होऊन तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते. अमेरिकेसह उत्तर गोलार्धातील बहुतांश देश जुलैमध्ये आपली उन्हाळी मालवाहतूक सुरू करतात. त्यातच

सर्वात मोठा तेल आयातदार देश चीन हा आपल्या शांघाय व इतर शहरांतील कोविड-१९ लॉकडाऊन उठविणार आहे. या पार्श्वभूमीवर तेलाच्या मागणीत जुलैमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

याचा लाभ सौदी अरेबिया उठवू पाहत आहे.विशिष्ट धर्मावरील भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेबद्दल कतार, कुवेत, इराण या देशांनी भारतीय राजदूतांनी बोलावून त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला.

भाजप नेत्यांच्या टीकेबद्दल आखाती देशांनी संताप व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन व अन्य अरब देशांनी आपल्या

सुपर स्टोअरमध्ये भारतीय उत्पादने विक्रीस ठेवण्यास मनाई केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!