माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला 900 ते 1400 रुपये तर सोयाबीनला 6100 रुपये
क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत.बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू असून आज मार्केटमध्ये 17146 गोणी व 9133.29 क्विटल कांद्याची आवक झाली.
लिलावात नंबर 1च्या कांद्यास कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1400 रुपये क्विंटल, नंबर 2 कांद्याला 600 ते 850 व नंबर 3 कांद्याला 300 ते 550 रुपये क्विंटल तसेच गोल्टी कांद्याला 750 ते950 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत.
तसेच राहाता बाजार समितीत काल सोमवारी लूज कांद्याला प्रतिक्विंटल 1252 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 6341 रुपये इतका मिळाला.
राहाता बाजार समितीत काल 185 वाहनांद्वारे कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1252 रुपये, कांदा नंबर 2 ला 550 ते 900 रुपये, कांदा नंबर 3 ला
100 ते 500 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळिंबाच्या 609 क्रेट्सची आवक झाली.डाळिंब नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 111 रुपये तर जास्तीत जास्त 150 रुपये,
डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.