माय महाराष्ट्र न्यूज:कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे.
मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात
मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या मान्सूनने कर्नाटक समुद्र किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या सीमेवर आला आहे. यामुळे मान्सून लवकरच
कोकणात दाखल होईल असं वाटतं होतं, परंतु मॉन्सूनचा प्रवास संथगतीने सुरू असल्याने अरबी समुद्रापर्यंतच पावसाचा वेग आहे. यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे आगमन लांबले आहे.
सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.
काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विविध भागात मॉन्सून दाखल झाला आहे.
तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून
मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील
आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे.पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व
मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कम दाबाचा पट्टा सक्रिय आहे.दरम्यान, पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य
महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.