Thursday, June 30, 2022

झोपताना या ५ गोष्टी कधीच डोक्याजवळ ठेवू नका

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. कारण त्याचा मानवी जीवनावर थेट किंवा

विपरीत परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे झोपताना काही गोष्टी अजिबात जवळ ठेवू नयेत. कारण असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत दोष निर्माण होऊ

शकतात. यासोबतच मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, ज्याचा व्यक्तीच्या प्रगतीवर, व्यवसायावर, करिअरवर वाईट परिणाम होतो. चला तर म जाणून घेऊया कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या झोपताना जवळपासही ठेवू नयेत

अनेकांना शूज किंवा चप्पल जवळ ठेवून झोपायची सवय असते त्यामुळे ते शूज आणि चप्पल बेडखाली ठेवतात. वास्तूनुसार असे करणे चांगले नाही. कारण ते नकारात्मक ऊर्जा

घरात आणते. ज्याचा शारीरिक आणि मानसिक प्रभाव पडत असतो. शूज किंवा चपला यांचा वापर आपण आपल्या पायांचे रक्षण करण्यासाठी करत असतो त्यामुळे आपल्या बिछाण्यापाशी त्यांना ठेवणे अशुभ आहे.

अनेकांना पर्स उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. पण असे करू नये. कारण वास्तूनुसार असे केल्याने पैशाच्या चणचणीला सामोरे जावे लागते. यासोबतच लव्ह लाईफवरही याचा

वाईट परिणाम होतो. कारण पर्समध्ये मुख्यत्वे धनाच्या संबंधित वस्तू असतात त्यामुळे पर्स झोपतावेळी आपल्यापासून दूरवर ठेवली पाहिजे. अनेक लोक आपल्या बेडजवळ

आरसाही ठेवतात. दरम्यान हे असे करणे टाळले पाहिजे. कारण आरशातून बाहेर पडणाऱ्या नकारात्मक उर्जेचा व्यक्तीच्या लव्ह लाईफवर वाईट परिणाम होतो. यासोबतच भयानक

स्वप्ने पडतात. दरम्यान काही लोकांचा असा देखील समज आहे की सकाळी उठल्याबरोबर प्रथम आरश्यात आपले तोंड पाहिल्यावर येणारा दिवस अशुभ जातो. त्यामुळे आरशापासून अंतर ठेवून झोपलेले कधीही चांगलेच आहे.

वास्तुशास्त्रानुसार सोन्याचे दागिने झोपताना जवळ ठेवू नयेत. ते अशुभ आहे. जे लोक बेडजवळ किंवा उशीजवळ सोने ठेवतात, अशा लोकांना जास्त राग येतो. तसेच नातेसंबंधात वाद

निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच कोणताही अलंकार घालून झोपणे देखील अशुभ मानले जाते. अनेकांना सवय असते की ते अभ्यास करत-करत झोपतात आणि ते झोपेतच

पुस्तक उशाखाली किंना बिछान्यावर कुठेही ठेवतात. पण वास्तुनुसार असे करू नये. कारण त्याचा करिअरवर वाईट परिणाम होतो. कारण पुस्तक ज्ञान देण्याचे काम करत असते त्यामुळे पुस्तकाची अशी विटंबना करणे चुकीचे आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!