Thursday, October 5, 2023

चिलेखनवाडी येथील बोलेरो-मोटारसायकल अपघातात एक ठार एक जखमी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका चिलेखनवाडी येथे नेवासा शेवगाव रोड गुंजाळ वस्ती जवळ झालेल्या बोलेरो मोटारसायकल अपघातात एक जण ठार एक जखमी झाल्याची घटना रविवार दि.१८ जून रोजी सायंकाळी ५:३९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील चिलेखनवाडी येथे माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांची वस्तीजवळ नेवासा-शेवगाव रोडवर शेवगाव कडून कुकानेकडे येणाऱ्या बोलेरो गाडीने मोटारसायकलला जोराचे धडक दिल्याने झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरा येथील रावसाहेब एकनाथ आहेर (वय 50) हे ठार झाले आहेत तर श्रीकांत रावसाहेब आहेर (वय 19) हे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
बोलेरोचा वेग इतका प्रचंड होता की बोलेरो गाड़ी रस्ता सोडून बाजूला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली.
मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर जखमीला नगर येथे उपचार साठी पाठवण्यात आले.

 

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!