Thursday, June 30, 2022

लॉजवर भेटण्यास नकार दिला, विवाहितेचा नको तो व्हिडीओ व फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सवर 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवल्याचा

धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. आरोपीने या विवाहितेशी

सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित करताना व्हिडीओ आणि फोटो काढले होते. त्यानंतर पुन्हा तिला लॉजवर येण्याची मागणी केली. पीडितेने नकार दिल्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ

व्हॉट्सअॅप स्टेटला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अन्य कलमानुसार गुन्हा

दाखल करण्यात आला आहे . पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील सांगवी परीसतील वस्तीवर राहणाऱ्या विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार लक्ष्मण मच्छिंद्र वीर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव इथला रहिवासी आहे.

आरोपीची बहिण 26 वर्षीय फिर्यादी महिलेच्या शेजारी राहत होती. तो बहिणीकडे सप्टेंबर 2021 मध्ये आला असताना दोघांची ओळख झाली. तिचा पती

कामाला गेल्यावर आरोपी तिच्या घरी बसण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

फेब्रुवारी 2022 मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात आरोपीने फोन करत फिर्य़ादीला लॉजवर भेटायला बोलावलं. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने

भेटण्यास नकार दिला. त्याच दिवशी त्याने तिला दोघांचे नग्न फोटो पाठवले. तसेच तु जर मला न भेटल्यास फोटो तुझ्या पतीला आणि भावाला पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर काही

वेळातच त्याने तिच्यासोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओ तिला पाठवला. तरीही फिर्यादीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर 27 मे रोजी त्याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला दोघांचे विवस्त्र

अवस्थेतील फोटो ठेवले. पीडितेने त्याचा स्क्रीनशॉट काढत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!