Sunday, July 3, 2022

पुरूषांनो, तुमच्यासोबत असताना महिलांना ‘या’ 4 गोष्टींची असते कायम भीती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रिलेशनशिप व नातेसंबंध ही अशी गोष्ट आहे जी अवघ्या आयुष्यावर परिणाम करू शकते. जेव्हा आपण एखाद्या अनोळख्या

व्यक्तीशी नाते जोडतो तेव्हा आपल्याला चांगले तर वाटते. आयुष्यात नवीन आलेला हा माणूस आयुष्य सुंदर सुद्धा बनवतो, पण दुसरीकडे अनेक बाबतीत

टेन्शन व चिंता देखील लागलेली असते. ही चिंता कोणत्याही बाबतीत असू शकते. कोणाला त्या व्यक्तीबद्दल असू शकते, कोणाला भविष्याबाबत असू शकते, कोणाला कुटुंबाबाबत असू शकते तर

कोणाला आर्थिक स्थितीबाबत असू शकते.शेवटी आपले नाते हे कोणत्याही स्थितीत उत्तम राहावे हीच सगळ्यांची इच्छा असते. तर अशावेळी पुरूषांपेक्षा स्त्रियांना आपल्या नात्याबाबत

खूप जास्त काळजी असते आणि त्यांना काही गोष्टींची खूप भीती वाटत असते. स्त्रियांना सतत ही भीती लागून राहिलेली असते की मी माझ्या जोडीदाराला आवडते की नाही? आता आवडते आहे .

पण उद्या मी आवडू नाही लागली तर? यांसारख्या गोष्टी स्त्रियांच्या मनात सतत सुरु असतात आणि या गोष्टी त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही. अशाच प्रकारे त्यांना आपण सासरच्यांकडच्यांना

देखिला आवडू की नाही याची काळजी लागून राहिलेली असते. एकंदर नाते कोणतेही असो त्या नात्यात स्त्रियांना सतत आपण एखाद्याच्या नजरेत नावडते झालो तर काय ही भीती सतत लागून राहिलेली असते.

ही भीती तर पुरुषांना देखील मोठ्या प्रमाणात असते. नात्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, ज्याचे आपल्या जोडीदारावर खरे प्रेम आहे त्याला सतत ही भीती लागून राहिलेली असते की

हे नाते तुटणार तर नाही ना? अर्थात आपल्या माणसाला कधीची गमावू नये ही त्या मागची भावना असते. पुरूषांपेक्षा स्त्रिया जास्त संवेदनशील असल्याने त्याला ही भावना कंट्रोल करता येत

नाही व सतत्त्या या तणावाखाली जगतात. अशावेळी जोडीदाराने त्यांची ही भीती ओळखून त्यांना आश्वस्त करणे महत्त्वाचे आहे.स्त्रिया आपल्या शरीराबाबत खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात.

शरीरातील छोट्यातील छोटा बदल त्यांच्या मनात विचारांचे वादळ निर्माण करू शकतो. खास करून आई झाल्यावर जे शारीरिक बदल होतात त्यांचा विचार करून स्त्रिया खूप जास्त तणावाखाली असतात.

कारण ओव्हरऑल आपल्या एकंदर पर्सनॅलिटीमध्ये फरक पडेल. इतर लोकं आणि आपला जोडीदार देखील आपल्याला खिल्ली उडवण्याच्या नजरेने पाहिल अशी भीती त्यांच्या मनात लागून राहिलेली असते.

यामुळे आपल्या जोडीदाराचे प्रेम कमी होईन ही भीती तर सर्वाधिक असते.अनेकजण असं म्हणतात की जस जशी वर्षे उलटतात आणि संसार सुरु राहतो तस तसे प्रेम कमी होते. संसाराच्या

जबाबदाऱ्या आणि बाकी गोष्टी यात कपल्स इतके मिसळून जातात की एकमेकांवर असलेले प्रेम पूर्णत: विसरून जातात आणि एकमेकांना ते वेळच देत नाहीत. ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे.

पण ही गोष्ट टाळायची कशी आणि आपले प्रेम टिकवायचे कसे हे त्या त्या कपल्स वर अवलंबून आहे. जर त्या कपल्सनेच एकमेकांवरचे प्रेम सोडले आणि पूर्णत: संसारालाच स्वतःला हरवून घेतले

तर हीच स्थिती उद्भवणार! त्यामुळे ही एक भीती स्त्रियांच्या मनात घर करून असते.मुळात भीती देखील एक भावना आहे त्यामुळे त्याबाबत जास्त विचार करू नये. जेवढा जास्त विचार

कराल तेवढा जास्त ताण येईल आणि तेवढी जास्त भीती वाटेल. त्यामुळे शक्य तितके सकारात्मक राहावे. तुमचा जोडीदार प्रत्येक बाबतीत सोबत आहे ना मग खुशाल या भीतीला

दूर सारावे आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. अनेकदा ही भीती आपल्या जोडीदाराशी बोलल्याने देखील कमी होते. त्यामुळे त्याच्याशी मनसोक्त बोलावे. यामुळे मनावरचा ताण हलका होईल आणि जास्त टेन्शन येणार नाही.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!