Friday, July 1, 2022

पुरूषांनो, पहिल्यांदा ‘सेक्स’ करताना ठेवा या ‘८’ गोष्टींचे भान; अन्यथा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पहिल्या सेक्स अनुभवाबद्दल प्रत्येकाच्याच काही कल्पना, आशा आणि अपेक्षा असतात. मात्र वास्तव अनेकदा वेगळं असतं.

जोडप्यांमधला बुजरेपणा, भीती किंवा अवघडलेपण यामुळे परिस्थिती बिघडू शकते. म्हणूनच पहिल्यांदा सेक्स करताना पुरूषांनी या काही गोष्टींचे जरूर भान ठेवायलाच हवे.

पहिल्यांदा सेक्स करताना सर्वात आधी येते ती सुरक्षितता. ही बाबदेखील महत्त्वाची आहे. बरेचदा पुरुष उत्साहाच्या भरात सुरक्षेचा विचार करतच नाहीत, परिणामी

लैंगिक आजार किंवा अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते म्हणूनच कंडोम आवर्जून जवळ ठेवावा.शारिरीक गरज ही अनेकदा अहंकाराची गोष्ट बनते आणि यामुळे

सारे काही विस्कटून जाते. चित्रपटात किंवा पॉर्न फिल्ममध्ये दाखवल्या जाणार्‍या गोष्टी हे फक्त रंजित व काल्पनिक स्वरूप असते म्हणून या गोष्टींचे अनुकरण करणे टाळा व तुमच्या साथीदारासोबत

केवळ ‘त्या’ सुंदर क्षणांचा सुखद अनुभव घ्यायला शिका.पुरूष कामक्रीडेला वेळ देत नाहीत ही तक्रार बर्‍याच स्त्रियांची असते. प्रत्याक्षात संभोग करण्यापूर्वी कामक्रीडा करणे देखील

तितकेच महत्त्वाचे आहे. चुंबन, स्पर्श, ओरल सेक्स यासारख्या गोष्टींना देखील पुरेसा वेळ द्या. व यातून वातावरणनिर्मीती करा तसेच स्त्रियांना संभोगातून योग्य प्रमाणात ऑर्गेझम ( परमोच्च संभोगसुख) मिळेल याची काळजी घ्या.

काही वेळेस पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तुमचे शिश्न संवेदनशील असू शकते किंवा कदाचित तुमच्या साथीदाराला वेदना होऊ शकतात. पहिल्या सेक्सच्या

वेळेस वेदना होणे हे अगदी सामान्य आहे. दर पाच पैकी एका स्त्रीला असा त्रास होतोच. बर्‍याचदा शुष्क योनीमार्गामुळे हा त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य ती काळजी घ्या.पहिल्यांदा संभोग

करताना स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव होतोच हा गैरसमज आहे. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’

नामक अतिशय नाजुक पडदा (tissue) धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो.

त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा.सेक्स करण्यापूर्वी जोडप्यांमध्ये पुरेसा मोकळेपणा नसतो. याचा परिणाम लैंगिक सुखावर होतो. त्यामुळे एकमेकांशी

संवाद साधा. एकमेकांची आवडनिवड जाणून घ्या. शारीरिक संबंधाविषयी एकमेकांच्या अपेक्षा जाणून घ्या. भीती, शंका दूर करा. म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना कोणत्याही प्रकारचं दडपण राहणार नाही.

पहिल्यांदा सेक्स करताना शीघ्रपतनाची किंवा शिश्नाची ताठरता न राहण्याची समस्या उद्भवू शकते मात्र हळूहळू योनी व शिश्न यांचा संबंध वाढला की,शीघ्रपतनाची समस्या कमी होते.

शीघ्रपतनासोबतच शिश्नाची ताठरता न राहणे ही समस्यादेखील मानसिक तणावामुळे आढळून येते. मात्र हळूहळू ही समस्यादेखील नाहीशी होईल. पण दीर्घकाळ ही समस्या

राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही समस्या रक्तदाब किंवा हृदयरोगाचे लक्षण असण्याची शक्यता असते.पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकजण १००% यशस्वी होतोच असे नाही.

त्यामुळे कोणतीही घाई न करता प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या व अनुभवांतून शिकत तो अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करा.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!