Sunday, July 3, 2022

सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट: त्यासाठी मी शरद पवारांकडे दोनदा तर अजित पवारांकडे तिनदा गेलो…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सरकारनामाचे संपादक योगेश कुटे यांनी विशेष मुलाखत घेतली संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मला असे वाटते की माझ्या खासदारकीच्या तीन वर्षांच्या कार्यकाळापैकी दीड-दोन वर्षे कोविडमध्ये गेले.

खरे तर खासदारकीचे एकच वर्षे पूर्ण झाले आहे. मी या कार्यकाळात केलेल्या कामातून समाधानी आहे.खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी मी व

माझे वडील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे दोन वेळा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे प्रत्येकी तीन वेळा गेलो होतो. मात्र

त्यांना वाटले मी निवडून येणार नाही. त्यांनी तिकीट दिले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपमध्ये गेलो. खासदार झालो. माझा निर्णय योग्य होता. सर्वांत जास्त

आमदार असूनही राज्यात सत्ता नसल्याने लोकांना तो निर्णय चुकीचा वाटत आहे. मी खासदार झालो त्यावेळी माझे आई व वडील दोघे नामदार व मी खासदार असे घरात तीन पदे असल्याने

लोकांनी निर्णय योग्य असल्याचे सांगितले होते. आता तेच लोक निर्णय चुकल्याचे सांगतात. माझ्या भाजप प्रवेशाच्या निर्णयावर माझे वडील मला कधीही बोलले नाहीत. आम्ही आमच्या निर्णयावर समाधानी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील हे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेसमध्ये ते अनेक वर्षे होते मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब

ठाकरे यांनी त्यांना पहिल्यांदा केंद्रात मंत्रीपद दिले. वडिलांना काँग्रेसने राज्यात मंत्रीपदे दिली मात्र पाटबंधारेसारखे मोठे मंत्रीपद दिले नाही. पक्ष कुठलाही असला तरी आम्ही हिमतीने लोकांच्यासमोर

जातो. वारंवार पक्ष बदलून सुद्धा लोकांना आमचा तिरस्कार असता असे वाटणाऱ्यांनी लोक आम्हाला निवडून का देता हे समजून घेतले पाहिजे. आमच्यासाठी पक्षापेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

जो लोकांचे प्रश्न सोडवेल त्याच्या बरोबर आम्ही जातो. आमचे अस्तित्व टिकले तर आम्ही जनतेसाठी काहीतरी करू. त्यामुळे वाईटपणा येतो. पक्षांतर्गतही वाईटपणा येतो, असे त्यांनी सांगितले.

मी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली त्यावेळी मी त्या मतदार संघाचा मतदारही नव्हतो. तरीही लोकांनी मला संधी दिली. उड्डाणपुलाच्या कामासाठी मी व

संग्राम जगताप एकत्र आलो. आमचे विचार जुळले. त्यामुळे ट्युनिंग जमले. कर्जत-जामखेडमध्ये मला विचारतात रोहित पवार तुमचे मित्र आहेत. त्यावेळी मी त्यांना सांगितले, रोहित पवार माझे शत्रू नाहीत.

मित्र आहेत की नाहीत यावर मी भाष्य करणार नाही. मात्र त्यांच्या काही कार्यपद्धती चुकतात. या बाबत मी त्यांना सांगितले आहे. कार्यकर्यांचा प्रवेश करून घेते. दबावाचा वापर करणे, ही

प्रथा राजकारणात योग्य नाही. ते लोक पक्षात येतील मात्र मनाने तेथेच राहतील. मला कोणी बिनविरोध करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला माझ्या विरोधात तिकीट द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे.

माझ्या विरोधात कोण उभा राहिल यावरून मी रणनीती आखत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर लोकांना आवाहन करेल. लोकांना योग्य वाटले तर ते निवडून देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!