Thursday, June 30, 2022

नगर जिल्ह्यातील या नेत्याला भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. या निवडणुकीत

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा

समावेश नाहीये आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच चित्रा वाघ यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र,

आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन सर्वांनाच भाजपने एक झटका दिला आहे.भाजपने ज्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये

प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर,

माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे केंद्र भाजपने घोषित केले आहेत.

या सर्व उमेदवारांची अर्ज आज आम्ही भरणार आहोत.आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीट असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या

चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो. पंकजा ताईंच्या

उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने इतरांना संधी दिली.चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं, पंकजा ताई या ऑलरेडी ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत.

मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर मध्यप्रदेश हे मोठं राज्य आहे आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!