Friday, July 1, 2022

नगर जिल्ह्यात कांद्याचे दर १५०० च्या पुढे 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये 4707 कांदा गोणीची आवक झाली. एक नंबर कांद्यास 1600 रुपये प्रति

क्विंटल बाजारभाव मिळाले आहे. नं. 1 रु. 1401 ते 1600, नं. 2 ला रु. 1201 ते 1401, नं. 3 ला रु. 951 ते 1201, गोल्टी रु. 551 ते 900,

खाद रु. 150 ते 501 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहे.अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने कांदा लिलाव वेळेत

पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी

 शेतकरी बंधूनी घ्यावी.शेतकरी बंधूनी कांदा विक्रीस आणताना 50 किलो बारदान गोणित, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन अकोले बाजार

समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात

कांदा काहीसा वधारला आहे. काल येथे कांद्याला 1150 ते 1600 रुपये भाव निघाला.आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार दोन दिवस कांदा बाजार होतो. काल शुक्रवारी 3186 कांदा

गोण्याची आवक उपबाजार आवारात झाली होती. यावेळी कांद्याचा दर काहीसा वधारलेला दिसुन आला. एक नंबर कांद्याला 1150 ते 1600 रुपये, दोन नंबरला 650 ते 1050 रुपये,

तीन नंबरला 250 ते 550 रुपये तर गोल्टी कांद्याला 400 ते 800 रुपयांचा दर मिळाला. गेले काही दिवस दर एक हजारापर्यंत स्थिर असल्याने आवक मंदावली होती.परीसरातील व गोदावरी

पट्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी येथील उपबाजार फायद्याचा असल्याने या उपबाजारला महत्व प्राप्त झालेले आहे. हा उपबाजार शेतकर्‍यांच्यादृष्टीने फायद्याचा ठरत असल्याने

परीसरातील शेतकर्‍यांनी आपला कांदा टाकळीभान उपबाजारात विक्रिसाठी आणावा, असे आवाहन संस्थेचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्षे, सचिव किशोर काळे,

उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!