Thursday, June 30, 2022

भेंड्यातील त्या 55 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य अन् पुढे जे घडलं त्याने नगर जिल्हा हादरला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलाला (वय 4) घरामध्ये घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना अहमदनगर

शहरातील एका उपनगरात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ

सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍या

सोनार बाबाला स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मारहाण

करणार्‍यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सोमवारी रात्री फिर्यादी घरामध्ये स्वयंपाक करत असताना

मुलाने त्यांच्याकडे पाच रूपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पाच रूपये देताच मुलगा घराच्या खाली असलेल्या किराणा दुकानामध्ये गेला. 10 ते 15 मिनिटे होऊन देखील मुलगा परत न आल्याने

फिर्यादी यांनी त्याचा घराच्या खाली शोध घेतला असता तो मिळून आला नाही. फिर्यादी यांना एका महिलेने सांगितले की,‘तुमच्या मुलाला सोनार बाबा घेऊन गेला आहे’, तेव्हा फिर्यादी

सोनार बाबाच्या घरी गेल्या असता सोनार बाबा मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा प्रकार उघडकीस आला.दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा केला .

असता तेथे स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी सोनार बाबाला मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

पीडित मुलाच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोनार बाबाविरूध्द अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील

तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत. तर सोनार बाबाच्या मृत्यूमुळे मारहाण करणार्‍यांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!