Saturday, July 2, 2022

सहकारी साखर कार्यकारी संचालक पदाचे पात्रता यादीसाठीची वयोमर्यादा 50 वरून 55 वर्ष करण्याची मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक पदाचे पात्रता यादी निकष नियमावलीमध्ये कमाल वयोमर्यादेची असलेली वयाची अट 50 वरून 55 वर्ष करावी अशी मागणी राज्यातील साखर उद्योगात कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गातून होत आहे.

राज्य शासनाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.18 एप्रिल 2022 रोजी परिपत्रक काढून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल करणेबाबत प्रस्तावित केलेले आहे. सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक पदाचे निकष नियमावलीमध्ये कमाल वयोमर्यादा 50 वर्ष अशी केलेली आहे.
परंतु राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील काही खाते प्रमुख या वयोमर्यादेमुळे साखर कारखान्यातील खातेप्रमुख म्हणून काम करित असलेले प्रदीर्घ अनुभवी उमेदवार कार्यकारी संचालक पात्रतेच्या परिक्षेपासून वंचित राहणार आहेत. म्हणून वयोमर्यादेची असलेली वयाची अट 50 वरून 55 वर्ष करावी अशी मागणी आहे.

याबाबतमहाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने संचालक मंळळाचे दि. 10 में 2022 रोजीच्या सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा करून कार्यकारी संचालकांचे पॅनलसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष ऐवजी 55 वर्ष करण्याचा ठराव पारित करून तो राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविलेला आहे.
त्यात नवीन पॅनेल करण्याची प्रक्रीया 7 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असल्याने बरेच अनुभवी उमेदवार इतर सर्व निकष पूर्ण करित असून देखिल या संधी पासून अकारण वंचित होत आहेत.परीणामी कनिष्ठ पातळीचे अधिकारी वरीष्ठ पातळीच्या अधिकाऱ्यांना (संधी दिना वंचित राहिल्याने) छेद करून वरीष्ठ झाल्यास व्यवस्थापनेत नाराजी होऊन काम करणे अडचणीचे होईल. कोवीड-19 रोगराई मुळे गेली 2 से 25 वर्षांचा अकारण व्यय झाल्याने त्या दरम्यान वयोमानाप्रमाणे पात्र असणाऱ्या मात्र त्यामुळे काळ दवडला गेल्याने आता अपात्र ठरणाऱ्या चांगल्या उमेदवारांवर अन्याय होवू नये हे पाहणे महत्वाचे राहील. म्हणून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांची नवीन पॅनल बनविण्यासाठी प्रदिर्घ अनुभव उमेदवारांची आवश्यकता लक्षात घेता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 50 वर्ष वरून 55 वर्ष पर्यंत करण्याची मागणी केलेली आहे.

*संघटित होऊन सरकार दरबारी आणि न्यायालयात दाद मागणे गरजेचे…*

सात वर्षापेक्षा जास्त कालावधीने निघालेली निवड प्रक्रियेची अधिसूचना अमलात येईपर्यंत अनेक खातेप्रमुख 50 शीच्या पार पोहचले आहेत. खरेतर यासाठी 1 जानेवारी 22 रोजी वय गृहीत धरता आले असते किंवा वयाची मर्यादा वाढविता आली असती. विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड याबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती आहे. न्याय मिळवण्यासाठी अन्यायग्रस्त खातेप्रमुखांनी संघटित होऊन सरकार दरबारी आणि न्यायालयात दाद मागणे गरजेचे आहे.

किरण शेलार
चीफ केमिस्ट,श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना. सोलापूर.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!