माय महाराष्ट्र न्यूज: नगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून शिर्डी पोलीस ठाण्यात एक महिला आणि तिच्यासोबत एका व्यक्तीच्या
विरोधात अश्लील व्हिडिओ तयार करून एका व्यक्तीकडून तब्बल 40 लाख रुपये खंडणी उकळण्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी महिलेला बेड्या ठोकण्यात
आल्या असून तिचा साथीदार मात्र अद्याप फरार आहे.उपलब्ध माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या एका साथीदारांसह एका व्यक्तीला
आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. महिला आणि फिर्यादी यांची आधीपासून ओळख असून आपली आर्थिक परिस्थिती गरीब आहे असे सांगत या महिलेने समोरील व्यक्तीकडून
वेगवेगळ्या कारणासाठी म्हणत पैसे उसने घेतले होते. अनेकदा पैसे परत मागितल्यानंतर देखील तिने पैसे दिले नाही आणि 7 मार्च 2022 रोजी या महिलेने फिर्यादी यांना फोन करून
बाभळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते.दुसऱ्या दिवशी फिर्यादी व्यक्ती हॉटेलवर पोहोचला असताना महिलेने आतून दरवाजा लावून घेतला आणि काही वेळातच तिथे एक पुरुष
रूममध्ये आला. त्याने या महिलेचे कपडे काढले आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करत फिर्यादी आणि या महिलेचे संबंध आहेत असे वदवून घेतले आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. आरोपी
याने आणि या महिलेने सदर प्रकार कोणाला सांगशील तर तुला जीवे ठार मारू आणि तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली आणि पुन्हा एकदा नऊ लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून उकळले.
हतबल झालेले फिर्यादी यांनी महिला आणि तिचा साथीदार असलेला राजेंद्र गिरी याच्याविरोधात कलम 384 नुसार गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी संजय
सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे या करत आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात अशा प्रकारचे प्रमाण वाढलेले असून नगर शहरानजीक खातगाव टाकळी आणि वडगाव
गुप्ता इथे अशा घटना याआधी देखील घडलेल्या आहेत.