माय महाराष्ट्र न्यूज:इन्स्टाग्रामवर मैत्री करून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणारा बीड जिल्ह्यातील मजुरी करणारा
विवाहित तरुण लोणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद येथून जेरबंद केला. सप्टेंबर २०२१ पूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या तरुणाने महाविद्यालयीन शिक्षण
घेणाऱ्या मुलीशी मैत्री करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी गाव निवडले. लोणीच्या बसस्थानकावर त्यांची भेट झाली. लोणीतल्याच एका हॉटेल मध्ये तिला
नेऊन तिचे फोटो काढले. फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून सप्टेंबर ते डिसेंबर चार महिने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.मुलीने मात्र आपल्या घरी ही गोष्ट सांगितली नाही.
मात्र या तरुणाने विवाहित असूनही मुलीच्या वडिलांना फोटो पाठवून तिच्याशी लग्न करण्यासाठी धमक्या दिल्या. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्याविरुद्ध लोणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.