Thursday, June 30, 2022

पंकजा मुंडेंनंतर आता लक्ष्य रोहित पवार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत जलसंधारण मंत्रालयाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना डावलत

राज्याच्या राजकारणात अचानक चमकणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना भाजपने आता पुन्हा एकदा विधान परिषदेतून सक्रिय राजकारणात उतरविले आहे.

जलसंधारण मंत्रालयांतर्गत जलयुक्त शिवार ही युती सरकारची महत्वाकांक्षी योजना राबविली जात असतांनाच परदेश दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडे यांना कानोकान खबर न होता .

या मंत्रालयाचा कारभार देवेंद्र फडणवीसांनी तेंव्हा राम शिंदे यांच्याकडे सोपविला होता. त्यांची अशी लॉटरी लागण्याची ती पहिलीच वेळ. त्याआधी राम शिंदे यांची ओळख पंकजा मुंडे यांचे

समर्थक अशीच होती. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनीच पंकजा मुंडे यांनी “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे” असं वक्तव्य करून

भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. हा थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान देण्याचा प्रकार मानला गेला. नगर जिल्ह्यातील बहुचर्चित चिक्की घोटाळा उघडकीस आल्यानंतर

मात्र त्यांना बॅकफूटवर जावं लागलं. आता अडीच वर्षांनंतरही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल अशी शक्यता असतानाच राम शिंदे यांचे नाव जाहीर झाल्याने पुन्हा एकदा

लॉटरी लागल्याचा फील त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही येतो आहे.कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी

मागच्याच निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव केला होता. या दोन्ही तालुक्यातून गेल्या अडीच वर्षात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला आहे. शरद

पवार यांनी मध्यंतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने चोंडीत येऊन आ. रोहित पवार यांना त्याची पोहोच पावती आशीर्वादासह दिली होती.

जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दिसत असतानाच होळकर घराण्याचे वंशज मानले जाणारे राम शिंदे आमदार म्हणून पुन्हा नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात

सक्रिय होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिसऱ्या पिढीतील ‘पॉवरफूल’ बनत चाललेल्या नेतृत्वाला मतदार संघातूनच शह देण्यासाठी

भाजपने डिस्चार्ज झालेल्या राम शिंदे यांना ‘चार्ज’ केल्याचे मानले जाते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!