माय महाराष्ट्र न्यूज:अॅमेझॉनवर या महिन्यात एक्सप्लोसिव्ह डील ऑफ द मंथ दिली जात आहे. महिन्यातील या सर्वात मोठ्या डीलमध्ये तुम्ही
Samsung Galaxy S20 FE MRP खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता.8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 74,999 रुपये आहे. Amazon डीलमध्ये, तुम्ही 63% डिस्काउंटनंतर ते 27,999 रुपयांमध्येमध्ये
हा फोन ऑर्डर करू शकता. कंपनी फोनवर 1,750 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देखील देत आहे.याशिवाय या फोनवर तुम्हाला 22,800 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसही मिळू शकतो. जर तुम्हाला जुन्या फोनवर संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळत
असेल तर हा फोन तुम्ही 5,199 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मात्र लक्षात ठेवा की एक्सचेंजवर उपलब्ध असलेली अतिरिक्त सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल.फोनमध्ये
6.5-इंचाचा Infinity-O सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. हा फुल एचडी + डिस्प्ले 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनी फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देत आहे.
यामध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलवर तुम्हाला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल आणि 12-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल
टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे.तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 4500mAh ची आहे. ही 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 11 वर
काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, 5जी, 4जी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह सर्व स्टँडर्ड पर्याय देण्यात आले आहेत.