माय महाराष्ट्र न्यूज:एका महिला सायकलपटूने मुख्य प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर ‘अयोग्य वर्तन’ केल्याचा आरोप केल्यानंतर
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्लोव्हेनियाला प्रशिक्षणासाठी आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या संपूर्ण भारतीय संघाला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महिला
सायकलपटूचे पत्रही समोर आले असून, त्यात तिने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.भारतीय महिला सायकलपटूने लिहिलेल्या पत्रात प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर
गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 15 मे ते 14 जून या कालावधीत सायकलिंग प्रशिक्षण शिबिरासाठी आम्हाला स्लोव्हेनियाला जायचे होते, तेव्हा सर्व तयारी सुरु झाली होती, निघायच्या
तीन दिवस आधी प्रशिक्षक आर के शर्मा यांनी मला फोन केला आणि सांगितले की, तिला त्यांच्यासोबत रूम शेअर करावा लागेल. हे ऐकून मला धक्काच बसला आणि खूप तणावात गेले, मी फिजिओशीही याबाबत बोलले.
महिला सायकलपटूने सांगितले की, दोन दिवसांनी मी स्लोव्हेनियाला जाण्यासाठी फ्लाइट पकडून तिथे काही वेगळी व्यवस्था होईल असे वाटले. पण हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मला
वेगळी खोली नाकारण्यात आली. प्रशिक्षक आरके शर्मा तिच्याशी उद्धटपणे बोलले आणि तिला धमकावले की, त्यांना वाटलं तर ते आला शिबिरातही येणार नाही. मात्र, नंतर मला वेगळी
खोली देण्यात आल्याने प्रशिक्षक चांगलेच संतापले आणि त्यांनी माझे करिअर संपवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.पुढे, महिला खेळाडूने सांगितले की, 19 मे रोजी प्रशिक्षकाने
तिला मसाजसाठी खोलीत बोलावले, इतकेच नाही तर 29 मे रोजी प्रशिक्षक तिच्या खोलीत बळजबरीने घुसला आणि बळजबरी सुरू केली. त्यानंतर मी स्वतःची काळजी घेतली आणि नंतर
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर मी परत येण्याचा निर्णय घेतला, मी परत येत असतानाही प्रशिक्षकाने तिला धमकावले.भारतीय संघात पाच पुरुष आणि एक महिला सायकलपटू
आहे आणि आधीच्या वेळापत्रकानुसार ते स्लोव्हेनियाहून १४ जूनला परतणार होते. SAI ने यापूर्वीच आरोप करणाऱ्या सायकलपटूला परत बोलावले आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन केली आहे.
सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (CFI) अध्यक्ष ओंकार सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, SAI ने सध्याचा दौरा मध्येच संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे सिंग म्हणाले, “एसएआयच्या
अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी सीएफआयला सांगितले आहे प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यासह संपूर्ण संघाला स्लोव्हेनियामधून ताबडतोब परत बोलावण्यात येईल,”. तसेच SAI ने प्रशिक्षक
शर्मा यांना लवकरात लवकर परतण्यासाठी वेगळा संदेश पाठवला होता. या प्रकरणी SAI ने तपासासाठी आधीच एक समिती स्थापन केली आहे, जी प्रकरणाच्या प्रत्येक पैलूवर जाऊन दोन्ही बाजू ऐकून घेईल.