Thursday, June 30, 2022

तीन दिवस बँका बंद; महत्वाची कामं उरकून घ्या!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी या महिन्यात संपावर जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांनी येत्या २७ जून रोजी संपावर

जाण्याचा इशारा दिला आहे. बँकांच्या एकूण ९ कर्मचारी संघटनांनी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी जर २७ जून रोजी संपावर गेले तर

सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. कारण २५ जून रोजी या महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि २६ जून रोजी रविवार आहे. त्यात २७ जून रोजी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास सलग तीन

दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. त्यामुळे तुमचं काही बँकेचं महत्वाचं काम असेल तर या कालावधीआधीच उरकून घ्या. नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनकडून गेल्या अनेक महिन्यांपासून कामकाज आठवड्यातून ५ दिवसांचं असावं अशी मागणी केली जात आहे. दर आठवड्यात फक्त पाच दिवसांचं

काम असावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. खासगी क्षेत्रातील अनेक बँकांमध्ये या संबंधिचा नियम लागू आहे असं सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पाच दिवसांचा

आठवडा आणि पेन्शन संबंधिच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत, तर कर्मचारी २७ जून रोजी संप करतील अशी भूमिका बँकांच्या युनियननं घेतली आहे.मनी कंट्रोल डॉट कॉमच्या

वृत्तानुसार युनायडेट फोरम ऑफ बँक युनियनमध्ये (UFBU) देशातील एकूण ९ बँक युनियन्सचा समावेश आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्लॉई

असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर यांनीही संपात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे.बँक कर्मचारी २७ जून रोजी संपावर गेले तर ग्राहकांना मोठा फटका

बसू शकतो. कारण २७ जून रोजी संपाचा दिवस सोमवार आहे. २६ जून रोजी रविवार आणि २५ जून महिन्याचा शेवटचा शनिवार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!