Friday, July 1, 2022

खुशखबर! जन धन खातेधारकांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारकडून जन धन खात्याची योजना सुरु करण्यात आली होती. तुम्हीही हे अकाऊंट सुरु केलं असेल, तर तुम्ही कोणत्याही

सरकारी योजनेचा अगदी सहज लाभ घेऊ शकता. कोणत्याही योजने अंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करते, त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जन धन खात्यात ट्रान्सफर केले जातात.

सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3000 रुपये ट्रान्सफर करते. या सरकारी योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे

पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. जन धन खातेदारालाही या योजनेचा लाभ मिळतो.केंद्र सरकारच्या मानधन योजनेत 18 वर्ष ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी यामध्ये

सहभागी होऊ शकते. या खातेधारकांना वार्षिक 36000 रुपये मिळतील. जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे ट्रान्सफर केले जातात.

यामध्ये वर्षाला 36000 रुपये ट्रान्सफर होतात.असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. पथ विक्रेते (स्ट्रीट वेंडर), मध्यान्ह

भोजन कामगार (मिड-डे मील वर्कर), हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर इ. या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

याशिवाय तुमचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.या योजनेचा फायदा घेम्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

याशिवाय तुमचे जन धन खाते असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या सेविंग अकाऊंटचे डिटेल्ससुद्धा सबमिट करावे लागतील.या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार, दरमहा

55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40

वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFSC कोड आवश्यक असेल. याशिवाय

तुमच्याकडे आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी , एखाद्याला जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजेच CSC शोधण्यासाठी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल.

पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल.तुमचा तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकताच तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळेल. यानंतर सुरुवातीचे योगदान

रोख स्वरूपात द्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. LIC, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC), EPFO ​​किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयात

जाऊन देखील अर्ज केला जाऊ शकतो. काही राज्यांमध्ये कामगार विभाग स्वतः नोंदणी मोहीम राबवत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!