माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची 70 हजार 371 गोण्या
आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1600 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 1400 ते 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.मोठा कलरपत्ती कांद्याला 1200 ते 1450 रुपये, मुक्कल
भारी कांद्याला 1100 ते 1250 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये जोड कांद्याला 200 ते 450 रुपये, हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.
सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या दराची देश पातळीवर चर्चा आहे. अनेक बाजार समित्यामंध्ये कांद्याला किमान ५० पैशांवरून १ रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक ते दोन रुपये किलो दराने माल विकावा लागत आहे, तर गुजरातचीही अवस्था वाईट आहे. येथील अनेक भाजी मार्केटमध्ये
कांद्याचे भाव अत्यंत कमी दरात जात आहेत. शेतकऱ्यांना 2 ते 4 रुपये किलो प्रमाणे कांदा विकावा लागत आहे परंतु अडते आणि व्यापारी किलोमागे 40 कांद्याला भाव घेत आहेत.