Friday, July 1, 2022

धक्कादायक:पॉर्न व्हिडिओज डाउनलोड करण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील मोफत वाय-फाय सेवेचा वापर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. बहुतेक लोक त्यांचे पेमेंट व्यवहार, महत्वाची बिले भरणे, तिकीट बुकिंग आणि इतर

अनेक गोष्टी फोनवरच करतात. म्हणूनच काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलत देशातील अनेक प्रमुख स्थानकांवर वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली होती.

ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. देशभरातील सुमारे 6100 रेल्वे स्थानकांवर प्रवासी मोफत हाय-स्पीड वाय-फाय वापरू शकतात. रेल्वेच्या वेळा, ऑनलाइन बुकिंग इत्यादी पाहण्यासाठी

लोक याचा वापर करतील, असे रेल्वेला वाटले होते, मात्र या वायफायचा वापर नक्की कशासाठी होत आहे याबाबतचा जो अहवाल समोर आला आहे तो आश्चर्यकारक आहे.टाईम्स ऑफ

इंडियाच्या वृत्तानुसार, रेल्वे स्थानकावर देण्यात आलेल्या वायफाय सुविधेचा गैरवापर होत आहे. बहुतांश प्रवासी मोफत वायफायचा वापर अश्लील कंटेंट पाहण्यासाठी किंवा ते डाउनलोड

करण्यासाठी करत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सिकंदराबाद स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ डाउनलोड केले आहेत.

सिकंदराबाद नंतर, हैदराबाद, विजयवाडा आणि तिरुपती स्थानकावर अशी प्रकरणे सर्वात जास्त दिसली आहेत.RailWire चालवणाऱ्या RailTel च्या सूत्रांनुसार, सिकंदराबाद आणि विजयवाडामधील

35% डाउनलोड हे पॉर्न कंटेंटचे आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्व विभागांची आकडेवारी पाहिली असता, त्यात युट्युब डाऊनलोड आणि इतर डाउनलोडमध्ये सर्वाधिक अश्लील कंटेंट

आढळून आला. SCR ने 588 स्थानकांवर हाय-स्पीड वायफाय सेवा देण्याची योजना आखली होती, परंतु विद्यमान नेटवर्कच्या मंद बँडविड्थमुळे ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.

त्यामागचे कारण पॉर्नोग्राफिक कंटेंट डाऊनलोड करणे हे सांगितले जात आहे.या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, दररोज 12 लाखांहून अधिक वापरकर्ते RailWire वापरतात.

त्यांच्या गेटवे डेटावरून असे दिसून आले आहे की, सर्च आणि डाउनलोड कंटेंटमध्ये पॉर्न कंटेंटचे प्रमाण जास्त आहे. भारत सरकारने अनेक पोर्नोग्राफिक वेबसाइट्सवर बंदी घातली असली

तरी, लोक ते एक्सेस करण्यासाठी व्हिपीएन (VPN) वापरत आहेत. RailTel 30 मिनिटांसाठी हायस्पीड इंटरनेट सुविधा देत आहे, मात्र त्याचा गैरवापर चिंतेचा विषय आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!