Thursday, October 5, 2023

महाराष्ट्रात बीआरएस दमदार एन्ट्री, या जिल्ह्यातील कांदा जाणार तेलंगणाला

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती (BRS) जोरदार एन्ट्री झाली असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या ‘कांदा ‘ प्रश्नावर हात घालत नाशिकमध्ये पायाभरणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीसाठी ‘ बीआरएस ‘ ची चाचपणी सुरू असून बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात कांदा तेलंगणा राज्यात विक्रीसाठी नेण्याची घोषणा केली आहे.

अब की बार, किसान सरकार चा नारा देत राज्यात शिरकाव करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या कांदा प्रश्नांवर हात घालत नाशिक जिल्ह्यात आपला

पाया भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिकच्या लासलगावातील उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या भेटी घेत कांदा तेलंगणातील हैदराबाद बाजार समितीत पुढच्या आठवड्यापासून विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था

करण्याची घोषणा केली. विंचूर बाजार समितीत झालेल्या कांदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्या भेटीने बीआरएसने शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कांदा प्रश्नावर हात घालत शेतकऱ्यांना दिलासा देत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.

विंचूर उपबाजार समितीत कांद्याला दर कमी मिळत असल्याने दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यामध्ये कांद्याला दोन रुपयांपर्यंतचा दर मिळत असताना तो महाराष्ट्रात का मिळू शकत नाही,

असा संतप्त सवाल केला होता. या आंदोलनाची सोशल माध्यमांत चर्चा झाल्यानंतर त्याची दखल घेत भारत राष्ट्र समिती पक्षाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट विंचूर येथे उपबाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी

विंचूर येथील कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे जाहीर करत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पाठविला असता, 1900 ते 2000 रुपये इतका बाजारभाव ‘मिळाल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!